mithun 
देश

'मी कोब्रा' म्हणाले पण निवडणूकीपासून दूरच; भाजपच्या अंतिम यादीत नावच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क

कोलकता - भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. भाजपमध्ये प्रवेश करताना ‘मी कोब्रा आहे, असे म्हणणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचे नाव यात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. यादीत एकूण १३ उमेदवारांची नावे आहेत. राशबेहारीची जागा मिथुनदांसाठी राखीव ठेवण्यात येईल, असा अंदाज होता, मात्र भाजपने येथून निवृत्त लेफ्टनंट जनरल सुव्रत साहा यांना उमेदवारी दिली आहे. काश्‍मीरमधील स्थिती नाजूक असताना ते तेथील लष्कर विभागाचे प्रमुख होते. कोलकत्यात प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा दक्षिण कोलकतामधील राशबेहारी ही प्रतिष्ठित जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत होते. ही सभा ज्या भव्य ब्रिगेड परेड मैदानावर झाली होती, तेथे मिथुनदांनी त्यांच्या ‘एमएलए फटाकेश्‍तो’ या बंगाली चित्रपटातील ‘मी तुला येथे मारीन अन तुझा मृतदेह स्मशानभूमीत दिसेल,’ हा लोकप्रिय संवाद म्हटला होता. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ‘मी पाण्यातील किमवा वाळवंटातील निरुपद्रवी साप नाही तर मी कोब्रा आहे. माझ्या एकाच दंशात तुमचा नाश होऊन तुम्ही छायाचित्रातून दिसाल,’ असा नवा टाळ्या मिळविणारी संवादफेक केली होती.

उमेदारी मिळण्याची आशा कायम
अलीकडच्या काही आठवड्यात त्यांनी मुंबईतील मतदानकार्डातून नाव काढून कोलकतात मतदार म्हणून नोंदणी केली होती. या सर्व घडामोडींनंतरही निवडणूक लढविण्याची मिथुन चक्रवर्ती यांची इच्छा अपूर्णच राहिल्याचे दिसत आहे. तरीही पुढे अन्य एखाद्या उमेदाराला बदलून मिथुनदांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नंदिग्राम येथील भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी मिथुन चक्रवर्ती येत्या ३० रोजी प्रचारसभा घेणार आहेत, ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. यावेळी होणाऱ्या ‘रोड शो’मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहभागी होण्याची वर्तविली जात आहे.

मतदारसंघात बदल
भाजपने आज जाहीर केलेल्या अंतिम यादीत उमेदवारांच्या मतदारसंघात बदल केले आहेत. माजी आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांचा उत्तर बंगालमधील अलीपूरदूअर हा मतदारसंघ बदलून त्यांना बलूरघाटमधून उमेदवारी दिली आहे. अन्य एक महत्त्वाचा बदल म्हणजे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गैघाटा येथे सुव्रत ठाकूर या नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. भाजपचे खासदार शंतनु ठाकूर यांचे ते भाऊ आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबाजवणी आणि नागरिकत्वावरी अनिश्‍चितता संपविण्यास भाजप कमी पडल्याने ते नाराज होते. त्यामुळेच भावाला उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT