mamta-banerjee 
देश

पश्‍चिम बंगालमध्ये ममतांची सत्ता टिकणार

श्‍यामल रॉय

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानपूर्व कलचाचणीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला निसटते यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही कलचाचणी १५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आली असून ११७ मतदारसंघांमधील ९,३६० मतदारांना प्रश्‍न विचारण्यात आले होते. ‘सीएनएक्स-एबीपी आनंदा’ या संस्थेने घेतलेली ही दुसरी कलचाचणी होती. आधीच्या कलचाचणीतही तृणमूलच्याच विजयाची शक्यता वर्तविण्यात आली होती. पहिल्या कलचाचणी प्रमाणे या चाचणीतही तृणमूलला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. भाजपचा टक्का मात्र पहिल्या कलचाचणीतील ३७ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर घसरल्याचे दिसून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डाव्या पक्षांची मतांची टक्केवारी १७ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर गेली आहे. सर्व पक्षांकडून आक्रमक प्रचार होत असल्याने राजकीय वातावरण बदलत असल्याने हा बदल झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ताज्या कलचाचणीनुसार, तृणमूलला राज्यातील एकूण २९४ जागांपैकी १५६ ते १५८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मुख्यमंत्रिपदासाठी ममता यांनाच नागरिकांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नावाला ४३ टक्के नागरिकांनी पसंती दर्शविली असून २४ टक्के जणांनी भाजपचे दिलीप घोष यांना पसंती दाखविली.

हिंदुत्वाचे कार्ड खेळू नका; ममता बॅनर्जींची गर्जना
नंदीग्राम - ‘मी रोज चंडीपाठ करूनच घराबाहेर पडत असते. विरोधकांनी माझ्यासोबत हिंदुत्वाचे कार्ड खेळू नये. नंदीग्रामची जनता सांगेल तेव्हाच मी येथून उमेदवारी अर्ज भरेल. येथेही विभाजनाचे राजकारण करण्यात येईल पण लोकांनी त्यावर विश्‍वास ठेवता कामा नये,’’ असे प्रतिपादन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे सभेत बोलताना केले. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता स्वतः मैदानात उतरल्या असून सर्वच ठिकाणी आक्रमक प्रचार करण्यावर त्यांचा भर दिसतो.

ममता म्हणाल्या की, ‘‘ मी गावात राहणारी मुलगी आहे, प्रत्येक नाव विसरू शकते पण नंदीग्रामला मात्र कधीच विसरू शकत नाही. सिंगूर आणि नंदीग्रामला मीच सोबत आणले आहे. ही जागा रिकामी असल्यानेच मी येथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. माझा संघर्ष तुम्ही सगळ्यांनीच पाहिला आहे.’ भाजपने माझ्यासोबत हिंदू कार्ड खेळता कामा नये. मी देखील एक हिंदूच आहे. नंदीग्राममधील जनता भाजपला एप्रिल फूल करेल. येथील जनतेने एक मुलगी म्हणूनच जर माझ्या नावाचा विचार केला तरच मी उमेदवारी अर्ज दाखल करेल, असेही त्यांनी सांगितले.

महाशिवरात्रीची पूजा येथेच करणार
भाजपने पुन्हा एकदा येथे जुना मार्क्सवादी पक्ष आणण्याचा प्रयत्न केला आहे. कधीकाळी याच पक्षाने रोज तुमच्यावर अत्याचार केले होते. यंदा महाशिवरात्रीची प्रार्थना देखील येथेच करेल. याच ठिकाणी अभिषेक केल्यानंतर मी जाईल, असेही ममता यांनी सांगितले. ममता बॅनर्जी या उद्या (ता.१०) रोजी येथून उमेदवारी अर्ज भरणार असून त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी हे १२ मार्च रोजी अर्ज दाखल करतील.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT