राजकारणात एकमेकांच्या विरोधात कितीही वेळा समोरासमोर आले असले तरी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना भेट पाठवली आहे. ही भेट पाठवून त्यांनी ११ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना आंबे पाठवले आहेत. (Mamata Banerjee sent gifts to PM Narendra Modi)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद(President Ramnath Kovind), उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh), काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांच्यासह १८ केंद्रीय मंत्र्यांना आंबे भेट म्हणून पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांनी ११ वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. २०११ साली जेव्हा ममता बॅनर्जी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या, तेव्हापासून त्या लंगडा, हिमसागर, आम्रपाली आणि लक्ष्मणभोग हे बंगालचे प्रसिद्ध आंबे पाठवतात.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंबा मेळावा भरवण्यात आलेला नव्हता. पण या वर्षी पुन्हा एकदा आंबा मेळावा भरवण्यात आला आहे. ममता आणि मोदी यांच्यात राजकीय मतभेद आहेत. ममता सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत असतात. मात्र तरीही काही दिवसांपूर्वीच ते एका कार्यक्रमात एकत्र चहा पिताना दिसले.
अभिनेता अक्षय कुमारला (Actor Akshay Kumar) दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनीही ममता यांच्यासोबतच्या आपल्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आमचं नातं चांगलं आहे. दीदी स्वतः माझ्यासाठी कुर्ता निवडतात आणि दरवर्षी पाठवतात. मला बंगाली मिठाई आवडते हे त्यांना माहित आहे, त्यामुळे त्या मला मिठाईही पाठवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.