Mamata Banerjee sakal
देश

Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस ममता जाणार

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी (ता. २७) होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. इंडिया आघाडीतील पक्षांचे सरकार ज्या राज्यांत आहे, त्या बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री नीती आयोगाने मुख्यमंत्र्यांसाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणर नसल्याने ममता यांच्या उपस्थितीबद्दलही साशंकता व्यक्त केली जात होती.

त्यापार्श्‍वभूमीवर ममता यांनी नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी, येथील विमानतळावर ममता यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘‘या बैठकीच्या निमित्ताने, भेदभाव करणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत मी निषेध नोंदविणार आहे, तसेच केंद्राकडून बंगालसह विरोधीपक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचाही निषेध नोंदविणार आहे व त्यानंतर या बैठकीतून निघून जाणार आहे,’’ असे ममता यांनी सांगितले. ‘‘या बैठकी आधी आठ दिवस भाषण लिहून द्यावे, अशी विनंती नीती आयोगाने केली होती त्यानुसार मी माझे भाषण लिहून पाठवले होते, त्यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला नव्हता, असे ममतांनी सांगितले.

हे मुख्यमंत्री जाणार नाहीत

एम. के. स्टॅलिन (तमिळनाडू), पिनराई विजयन (केरळ), भगवंत मान (पंजाब), सिद्धरामय्या (कर्नाटक), सुखविंदरसिंह सुक्खू (हिमाचल), ए. रेवंथ रेड्डी (तेलंगण) हे मुख्यमंत्री बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT