'बंगाल तोडण्याची हिंमत करू नका. रॉयल बंगाल टायगर इथंच राहतो.'
कोलकाता : तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी कोलकाता इथं टीएमसीच्या शहीद दिनाच्या मेळाव्यात (Martyrs Day Rally) उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी ममतांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार निशाणा साधला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजप सर्व राज्य सरकारे तोडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ममतांनी अग्निपथ योजनेवरही टीका केली. ‘लष्कराला पर्याय नाही. लष्कराशी खेळू नका.. तर लोकांना थेट सैन्यात घ्या आणि अग्निपथ रद्द करा, अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारलं. नुकत्याच झालेल्या जीएसटी निर्णयावरुनही बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली.
‘तांदळावरही जीएसटी आला आहे. भाजपचे मित्र आता शिजवलेला भात खाणार नाहीत. तांदूळ, मिठाई, लस्सी, दही, बताशा आणि कडुलिंबाच्या पानांवर किती जीएसटी लावण्यात आला आहे? आम्ही काय खाणार? कसे खाणार? आमचे पैसे परत करा. नाहीतर तुम्ही (भाजप) निघून जा,’ अशी टीका त्यांनी केलीय. कोलकाता पोलिसांनी रॅलीमुळं शहरातील वाहतुकीचे मार्ग बदललले होते. तसंच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयानं राज्य अधिकाऱ्यांना हुतात्मा दिनाच्या रॅलीचं आयोजन करताना राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपला बंगालला ‘लक्ष्य’ करू नका, असा इशारा देताना ममता म्हणाल्या, “ते म्हणतात की ते महाराष्ट्रानंतर बंगालला टार्गेट करतील.. तुम्ही रॉयल बंगालचा वाघ पाहिला आहे का? मी म्हणते, बंगाल तोडण्याची हिंमत करू नका. रॉयल बंगाल टायगर इथंच राहतो. खूप सावध रहा!’, असा इशाही त्यांनी मोदी सरकारला दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.