West Bengal Coal Scam Case  
देश

कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, 25 कोटींची संपत्ती जप्त

या करावाईत ईडीनं या दोन आरोपींच्या 25 कोटींहून अधिक किमतीच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

या करावाईत ईडीनं या दोन आरोपींच्या 25 कोटींहून अधिक किमतीच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणात ईडीनं कारवाई केली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अनुप मांझीच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन साथीदारांची नावं जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी अशी आहेत. (West Bengal Coal Scam Case)

ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मनी लांड्रिंग (Money Laundering Act) कायद्यांतर्गत सीबीआयनं (CBI) 27 नोव्हेंबर 2022 रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफाआयआर दाखल केला होता. त्यानुसार तपास सुरू झाला होता. दरम्यान, गुरुपाद मांझी यानं गुन्ह्यातून कमावलेले 89 कोटींहून अधिक रुपये आणि जयदेव मंडल यानं 2017 ते 2020 दरम्यान अनुपमा जी च्या लोकांना 58 कोटींहून अधिक रक्कम दिली असल्याची माहिती ईडी चौकशीतून समोर आली आहे.

या करावाईत ईडीनं काल या दोन आरोपींच्या 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जंगम स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी ईडीनं 56 ठिकाणी छापे टाकले होते. यासोबतच 181 कोटी रुपयांहून अधिक किमतीची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीनं विकास मिश्रा, अशोक मिश्रा आणि गुरुपद मांझी यांनाही अटक केली आहे.

ग्रुप अगा माझीमध्ये कोलकाताच्या 6 शेल कंपन्यांच्या माध्यमातून 104 कोटी रुपयांच्या गुन्ह्याची रकमेची अफरातफरी केली असल्याचा आरोप मंडल आणि मांझी यांच्यावर आहे. या रकमेचा वापर करुन या दोघांनी जंगम स्थावर मालमत्ता जमा केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सोबतच त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी हेही ईडीच्या रडारवर आले होते. ईडीकडून अनेकदा त्यांची चौकशीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT