What exactly was Shergil imam says in anti nationalist speech 
देश

शेरजीलने केलेल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमके काय म्हटले होते?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आसामला भारतापासून तोडून टाकण्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेरजीलवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसामला देशापासून वेगळे करण्याची भाषा करणाऱ्या आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेरजील इमामच्या बिहारमध्ये मंगळवारी दुपारी जेहानाबादच्या काकोबाजारात राहत्या घरी मुसक्‍या बांधल्या.

शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?
भाषणात शेरजील म्हणाला की, आपल्या संघटनेत पाच लाख लोक आहेत. तर, आपण भारतापासून आणि ईशान्य भारताला कायमस्वरूपी तोडून टाकू शकतो. कायम तोडता आले नाही, तर किमान एक महिना तरी भारतापासून आसामला वेगळे करू शकतो. रेल्वेच्या रुळावर, रस्त्यावर प्रचंड अडथळे आणा; जेणेकरून भारतीय जवानांना ते बाजूला करण्यासाठी एक महिना लागेल. आसामला भारतापासून वेगळे करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यानंतरच ते (सरकार) आपले ऐकतील. आसाममधील मुस्लिमांची स्थिती आपल्याला ठाऊक आहे. त्यांना छावण्यांत राहावे लागत आहे. या वेळी शेरजीलने आसामचे व्हिडिओ उपस्थितांना दाखविले होते.

तत्पूर्वी, दिल्ली पोलिस शेरजीलला ट्रान्झिट रिमांडसाठी अलिगडला घेऊल जाणार आहेत. त्याच्याविरुद्ध आसामसह पाच ठिकाणी देशद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो अनेक राज्यांना हवा होता. त्यात उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्ली यांचा समावेश आहे. पोलिसांनी रविवारी त्याच्या वडिलोपार्जित घरावरही छापा घातला. परंतु, त्या घरात काही हाती लागले नव्हते.

शरणागती नाही, पकडले असल्याचे दिल्ली पोलिसांचे स्प्ष्टीकरण
देशद्रोही कलमाखाली अटक केलेल्या शेरजील इमामने पोलिसांसमोर शरणागती नाही, तर त्याला पोलिसांनी पकडल्याचे दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपी बचावासाठी काहीही बोलू शकतो, शरणागती ही न्यायालयात पत्करली जाते, पोलिसांसमोर नाही, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले.

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेएनयूच्या शर्जील इमामला अटक

बिहारमध्ये शेरजीलला अटक केल्यानंतर त्याच्यावरील कारवाईची माहिती देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस हे पाटणा पोलिसांच्या मदतीने जेहानाबाद जिल्ह्यात सतत छापे घालत होते. 25, 26 आणि 27 जानेवारीला छापासत्र सुरूच होते. त्यात त्याचा भाऊ मुजम्मील इमाम सापडला. त्यानंतर काकोबाजार येथील त्याच्या निवासस्थानी शेरजीलला आज दुपारी पकडले. त्याच्याविरुद्ध 124 ए, 153 ए, 505 कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, अन्य तीन ठिकाणच्या हिंसाचाराप्रकरणी एसआयटी तपास करीत आहे. 13 ते 15 जानेवारी या काळात जामिया मिलिया येथील दंगलीप्रकरणी शेरजीलवर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने वेशभूषा बदलली होती का, असा प्रश्‍न विचारला असता अधिकाऱ्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT