२५ जानेवारी १९९० रोजी श्रीनगरच्या बाहेरील रावळपुरा येथे झालेल्या हल्ल्यात स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना यांच्यासह चार जण ठार आणि ४० जण जखमी झाले होते. जुन्या श्रीनगर एअरफील्डवर भारतीय हवाई दलाचे जवान ड्युटीसाठी त्यांच्या वाहनांची वाट पाहत होते तेव्हा त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
याविरोधात यासिन मलिक आणि इतर पाच जणांविरुद्ध ३१ ऑगस्ट १९९० रोजी जम्मूतील टाडा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मलिक व्यतिरिक्त, हवाई दलाच्या कर्मचार्यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर आरोपींमध्ये जेकेएलएफशी संलग्न अली मोहम्मद मीर, मंजूर अहमद सोफी उर्फ मुस्तफा, जावेद अहमद मीर उर्फ नाल्का, शौकत अहमद बक्षी, जावेद अहमद जरगर आणि नानाजी यांचा समावेश आहे.
जम्मूच्या विशेष टाडा न्यायालयात १९९० च्या घटनेच्या खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली. यावेळी भारतीय हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी यासिन मलिकच्या अडचणी वाढू शकतात. या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराने मलिकला मुख्य शूटर म्हणून ओळखले आहे. यासीन मलिकला दिल्लीच्या तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
जेकेएलएफ प्रमुख यासीन सध्या दहशतवादी फंडिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. (Marathi Latest News)
यासीनला गेल्या वर्षी जम्मूच्या विशेष टाडा न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची तर इतर खटल्यांमध्ये दहा वर्षांची शिक्षा झाली होती. या सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.