Hit And Run New Law Esakal
देश

Hit And Run New Law: का होतोय हिट अँड रनच्या नव्या कायद्याला विरोध? पेट्रोल पंप ठप्प पाडणाऱ्या संपाबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी

Hit And Run New Law: नव्या ‘हिट अँड रन कायद्या’विरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे आज देशाच्या आठ राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. जाणून घेऊयात संपाबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी

अंकिता खाणे (Ankita Khane)

Hit And Run New Law: नव्या ‘हिट अँड रन कायद्या’विरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे आज देशाच्या आठ राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब अन् गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव जाणवत आहे. राज्यामध्येही विविध शहरांत झालेल्या या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला. मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नाशिक, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी आंदोलन केले. तो कायदा काय आहे, त्यामध्ये काय बदल झाला आहे, कायद्यात बदल केल्यानंतर चालक का आक्रमक झाले आहेत, त्याचबरोबर याचा काय परिणाम आहे याबाबत आपण जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने आणलेल्या 'हिट अँड रन' कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले आहेत. हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी मुंबई, इंदूर, दिल्ली-हरियाणा, यूपीसह अनेक ठिकाणी ट्रकचालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत.

'हिट अँड रन' म्हणजे काय?

ज्या प्रकरणांमध्ये वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो ती प्रकरणे 'हिट अँड रन' म्हणून गणली जातात. हिट अँड रन प्रकरणांमध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो. जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता.

काय आहे 'हिट अँड रन' नवीन कायदा?

केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे.

यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.

कलम 104 मध्ये हिट अँड रन कायद्याचा उल्लेख

नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 104 मध्ये हिट अँड रन कायद्याचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार, चुकीच्या पध्दतीने वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, चालकाला जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाईल. कलम 104 (A) मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचवेळी, कलम 104B मध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की, जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर, चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.

केवळ ट्रकचालकच नाही तर बस, टॅक्सी, ऑटोचालकही याला विरोध करत आहेत. नवीन नियम खाजगी वाहन चालकांनाही लागू होतील. नवीन कायद्यातील तरतुदी खूप कडक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कायदा का कडक केला?

हिट अँड रनचे आकडे पाहिले तर नवीन कायद्याच्या कडकपणाचे कारण समजू शकते. सरकारी आकडेवारीनुसार, दरवर्षी ५० हजार लोक हिट अँड रन प्रकरणांमध्ये आपला जीव गमावतात. आंदोलक वाहनचालकांनी असा युक्तिवाद केला की, धडकेनंतर पळून गेल्यास नवीन कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल आणि थांबल्यास घटनास्थळी उपस्थित जमावाकडून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. अनेकदा रस्ता अपघात झाल्यास घटनास्थळी उपस्थित जमाव संतप्त होऊन चालकावर हल्ला करतात. अनेकवेळा हा हिंसक जमाव केवळ मारहाण करून थांबत नाही आणि प्रकरण मॉब लिंचिंगचे रूप घेते.

या प्रकरणांमध्ये मिळेल दिलासा

मात्र, नव्या कायद्यात वाहनचालकांनाही काही बाबतीत दिलासा मिळणार आहे. वाहनाने धडकलेल्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडल्यास किंवा वाहनासमोर आल्यास चालकाला जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा आणि दंड भरावा लागेल. मात्र चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे अपघात झाला तर चालकाला 10 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.

'हिट अँड रन' कायद्याबाबत काय म्हणतात कायदेतज्ज्ञ?

हिट अँड रन कायद्याबाबत नव्या कडक तरतुदींमुळे आव्हान वाढू शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वास्तविक अपघातानंतर चालकाला पोलिस किंवा दंडाधिकाऱ्यांना कळवावे लागेल, असे त्यात म्हटले आहे. जर तो पीडितेला मृत सोडून पळून गेला तर त्याला 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. हा दुहेरी त्रास असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अपघातानंतर ड्रायव्हर थांबला आणि पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा विचार केला, तर जमाव त्याला बेदम मारहाण करू शकतो. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता जर तो थांबला नाही तर त्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे. अशा प्रकारे हा कायदा दुधारी तलवार ठरू शकतो आणि त्यामुळेच आंदोलने सुरूच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT