Ram Mandir esakal
देश

Ram Mandir : राम मंदिरात अनुष्ठानाला सुरुवात; आज आहे प्रायश्चित पूजा; राम लल्लाची माफी का मागितली जात आहे?

Monika Lonkar –Kumbhar

Ram Mandir : मागील कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा लवकरच केली जाणार आहे. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. त्यासाठी आजपासून अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या विधीवत पूजेला सुरूवात झाली आहे.

या प्राण-प्रतिष्ठेच्या विधींची सुरूवात ही सर्वप्रथम प्रायश्चित पूजेने केली जाणार आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ही पूजा सुरू करण्यात आली असून पुढील ५ तासांपर्यंत ही पूजा सुरू राहणार आहे. यामध्ये यजमान प्रायश्चित पूजनापासून प्राण-प्रतिष्ठेच्या विधींची सुरूवात केली जाणार आहे.

या प्रायश्चित पूजेच्या माध्यमातून रामलल्लाची माफी मागितली जात आहे. असे मानले जाते की, प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी छिन्नी आणि हातोड्याचा वापर करण्यात आला, त्यामुळे, रामलल्लाला दुखापत झाली, त्याबद्दल माफी मागण्यासाठी ही प्रायश्चित पूजा आणि कर्मकूटी पूजा केली जात आहे. ही प्रायश्चित पूजा आणि कर्मकूटी पूजा नेमकी काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे प्रायश्चित पूजा?

यासंदर्भात पंडित दुर्गा प्रसाद यांनी Tv9hindi या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, प्रायश्चित पूजा ही एक प्रकारच्या उपासनेची पद्धत आहे. ज्यामध्ये, मानसिक, आंतरिक, शारिरीक आणि बाह्य अशा सर्व बाजूंनी प्रायश्चित केले जाते.

यातील बाह्य प्रायश्चित्तासाठी यजमानाला १० धार्मिक स्नान करावे लागतात. यामध्ये मग, पंचद्रव्य आणि इतर अनेक पदार्थांचा वापर करून स्नान केले जाते. आणखी एक प्रायश्चित गोदान देखील केले जाते आणि यामध्ये एक संकल्प देखील आहे.

यामध्ये यजमान गोदानाद्वारे प्रायश्चित करतात. तसेच, यामध्ये काही पैशांचे दान करून देखील प्रायश्चित केले जाते. पैशांसोबतच यामध्ये सोने दान करण्याचा देखील समावेश आहे.

ही प्रायश्चित पूजा कोण करतो?

पंडित दुर्गा प्रसाद यांनी टिव्ही ९ हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपण कोणतेही एखादे पवित्र कार्य किंवा यज्ञ करतो, तेव्हा त्यात यजमानाला बसण्याचा अधिकार आहे. यजमानाला प्रायश्चित म्हणून हे कृत्य करावे लागते. सामान्यपणे पंडिताला असे करावे लागत नाही. मात्र, यजमानाला असे प्रायश्चित करावे लागते.

जाणूनबुजून किंवा नकळतपणे आपण जे काही पाप केले आहे, त्याचे प्रायश्चित करणे ही यामागची मूळ कल्पना आहे. कारण, आपल्याकडून अशा अनेक चुका होतात की ज्याची आपल्याला साधी जाणीवही नसेल. त्यासाठी शुद्धीकरण हे अतिशय आवश्यक आहे. याला पवित्रीकरण देखील म्हटले जाते.

दरम्यान, या प्रायश्चित पूजनासाठी कमीत कमी दीड ते २ तासांचा वेळ लागेल आणि विष्णू पूजनसाठी देखील एवढाच वेळ लागू शकतो. प्राणप्रतिष्ठापणेसाठी सुरू करण्यात आलेली ही प्रायश्चित पूजा सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू झाली असून ही पूजा जवळपास ५ तासांपर्यंत सुरू राहणार आहे. तब्बल १२१ ब्राह्मण विधीनुसार ही पूजा करत आहेत.

कर्मकूटी पूजा काय आहे?

कर्मकूटी पूजा ही एक प्रकारची यज्ञशाळा पूजा आहे. ही यज्ञशाळा सुरू करण्यापूर्वी हवन कुंडाची पूजा केली जाते. त्यानंतर, भगवान विष्णूंची छोटीशी पूजा केली जाते. या पूजेनंतरच पुढील पूजेसाठी मंदिराच्या आत प्रवेश केला जातो. ही विष्णू पूजा केल्यानंतर पुढील पूजाविधी करण्याचा हक्क मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: विधानसभेआधी शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, अजितदादांचं टेन्शन वाढणार!

मजुराच्या पोटी जन्म, मेहनतीने राजकारणात नाव कमावलं, आता बनले श्रीलंकेचे राष्ट्रपती, कोण आहेत अनुरा कुमारा दिसानायके?

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

Latest Maharashtra News Live Updates: वेस्टर्न रेल्वेवर 23 आणि 24 सप्टेंबरला ब्लॉक

Buldhana Accident : सिमेंटचे खांब घेऊन जाताना काळाचा घाला! ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; दोन मजूर ठार,तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT