Narendra Modi position in BJP during the Ayodhya Ram mandir andolan marathi news  
देश

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदींचं पक्षात स्थान काय होतं? त्यांच्या शब्दाला किती महत्व होतं?

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर अखेर बांधले जात असून २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

रोहित कणसे

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर अखेर बांधले जात असून २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात येत असून विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाने भारतातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी दिली आहे. याच वादामुळे राजकीय क्षेत्र पूर्णपणे बदलून गेल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर राम मंदिर आंदोलनाने देशात भाजपला नवसंजीवनी दिली आणि आज केंद्रात भाजपचं सरकार असून भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो आहे.

भाजपच्या राजकीय क्षेत्रातील या यशात राम मंदिर आंदोलनाचा मोठा वाटा आहे. लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी सारख्या नेत्यांनी राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान दिलं होतं. अडवाणी यांनी रथयात्रा काढली आणि १९९२ साली बाबरी मशीद पाडण्यात आली. जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे होते? आणि त्यांचं भाजपमध्ये स्थान काय होतं याबद्दल आपण जाणून घेऊया.

इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या, मार्च १९९२ सालच्या उदय माहूरकर यांच्या रिपोर्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही माहिती देण्यात आली आहे. आज तकमधील एका रिपोर्टनुसार, तेव्हा नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्षामधील उगवता तारा असा उल्लेख करण्यात आला होता. यासोबतच भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या एकता यात्रेचे संयोजक ३८ वर्षीय नरेंद्र मोदी पक्षात महत्वाचे व्यक्ती म्हणून पुढे येत आहेत आणि त्यासाठी तशी कारणे देखील आहेत. एकीकडे यात्रेचे विश्लेषण सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जोरदार चर्चा आहे की, यात्रा सुरू ठेवण्यासाठी लाल कृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यासारख्या दिग्गज नेत्यांना तयार करण्यात देखील मोदी यशस्वी झालेत.

इतकेच नाही तर आता नरेंद्र मोदी यांच्यासोबत ज्येष्ठ नेते देखील चर्चा करत असतात. याचं कारण स्पष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतऱ सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत मोदी फक्त गुजरात भाजपचे महासचिवच बनले नाहीत तर राष्ट्रीय स्तरावर देखील पक्षाचे महत्वाचे नेते बनले.

तेव्हा नरेंद्र मोदी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी समिती आणि सहा सदस्य असलेल्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे देखील सदस्य होते. या समितीमध्ये लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी असे ज्येष्ठ नेते देखील सहभागी होते.

माहूरकरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की नरेंद्र मोदी आकर्षक हिंदी घोषणा तयार करण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे पक्षात स्वतःची ओळख बनवू शकले. इतकेच नाही तर राजकारणात मोठे मुरब्बी समजले जाणारे चिमनभाई पटेल हे देखील त्यांच्या कुशाग्रतेचा आदर करतात, दोघे जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा चिमनभाई त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्या भाजपा नेत्यांना अडचण ठरू शकतात जे मवाळ भूमिका घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

दरम्यान तेव्हाच्या मीडिया रिपोर्ट पाहाता हे स्पष्ट होतं की, राम मंदिर आंदोलनावेळी नरेंद्र मोदी यांच्या कुशलतेला योग्य जागा मिळत होती. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचा कारभार फार पूर्वीच आला होता, यानंतर २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान बनले आणि त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आयोध्येत राम मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. आता २२ जानेवारी रोजी मोदी राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT