FLiRT Covid Variant Esakal
देश

Covid New Variant : अरे बापरे! कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट आला समोर.. काय आहेत 'FLiRT'ची लक्षणं? भारताला किती धोका?

FLiRT Covid Variant: FLiRT ची खास गोष्ट अशी आहे की त्यामध्ये पूर्वीच्या संसर्ग किंवा लसीपासून मिळालेली प्रतिकारशक्ती टाळण्याची क्षमता आहे. सध्या तज्ज्ञ याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत, मात्र विशेष चिंता व्यक्त करत नाहीत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जगाची डोकेदुखी वाढवलेल्या कोरोनातून आता कुठे दिलासा मिळतो असं वाटत असतानाच पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाव्हायरस KP.2 चे नवीन प्रकार नोव्हेंबर 2023 पासून भारतात प्रचलित आहे. त्याला FLiRT असे टोपणनाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियामध्ये कोविडची वाढती प्रकरणे या FLiRT प्रकाराशी जोडली जात आहेत.

KP.2 प्रकार काय आहे?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, KP.2 हे JN.1 प्रकारातील आहे. हे ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहेत, ज्यामध्ये नवीन जनुकीय बदल आहेत. दोन रोगप्रतिकारक जनुकीय बदल दर्शविणाऱ्या अक्षरांवर आधारित याला FLiRT असे नाव देण्यात आले आहे. हे जनुकीय बदल व्हायरसला अँटीबॉडीजवर हल्ला करण्यास अनुमती देतात.

भारतात कशी आहे परिस्थिती?

INSACOG द्वारे केलेल्या 250 KP.2 जिनोम सिक्वेंसिंगपैकी 128 सिक्वेंस महाराष्ट्रात होते. मार्चमध्ये सर्वाधिक KP.2 सिक्वेंस आढळून आल्याचे बोलले जात आहे. अहवालानुसार, जागतिक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारत जगातील सर्वाधिक KP.2 सिक्वेंसची नोंद करत आहे. गेल्या 60 दिवसांत GISAID मध्ये भारताने अपलोड केलेल्या एकूण डेटापैकी 29 टक्के KP.2 चा होता.

सध्या भारतात JN.1 प्रकाराचा सर्वाधिक प्रभाव आहे. आकडेवारी दर्शवते की 14 मे रोजी भारतात कोविडची 679 सक्रिय प्रकरणे होती.

KP.2 कोणते गंभीर आजार होऊ शकतात?

FLiRT ची खास गोष्ट अशी आहे की त्यामध्ये पूर्वीच्या संसर्ग किंवा लसीपासून मिळालेली प्रतिकारशक्ती टाळण्याची क्षमता आहे. सध्या तज्ज्ञ याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत, मात्र विशेष चिंता व्यक्त करत नाहीत. अशोका विद्यापीठातील त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसचे डीन डॉ. अनुराग अग्रवाल यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'काळजी करण्याची गरज नाही'. ते म्हणाले, 'असे जनुकीय बदल यापूर्वीही पाहिले आहे.'

अहवालानुसार, अमेरिकेचे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) म्हणते की KP.2 मुळे इतर स्ट्रेनपेक्षा जास्त गंभीर आजार होऊ शकतात असे कोणतेही संकेत नाहीत.

त्याची लक्षणे काय आहेत?

वृत्तपत्राशी बोलताना इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे डॉ. राजेश चावला सांगतात की, यामुळे प्रभावित झालेल्या लोकांना चव आणि वास कमी होणे, सर्दी, खोकला, घसा दुखणे, नाक बंद होणे किंवा नाक वाहणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा यासारखी लक्षणे दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT