WhatsApp Update esakal
देश

WhatsApp Update : नवीन वर्षात घरबसल्या WhatsApp वरून काढता येणार LIC ची जंबो पॉलिसी

व्हॉट्सअ‍ॅप आणि LIC एकत्र येऊन ग्राहकांसाठी सुविधा अधिक सोप्या पध्दतीने घेऊन आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

LIC Policy on WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप सतत नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत असतं. तसंच भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) विमाधारकांसाठी (Policyholders) अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. आता हे दोघे एकत्र येऊन ग्राहकांसाठी सुविधा अधिक सोप्या पध्दतीने घेऊन आले आहेत.

बदलत्या काळानुरुप एलआयसीमध्ये बदल झाले आहेत. नवनवीन तंत्रज्ञाना आधारे एलआयसीने ग्राहकांना अनेक सुविधा पुरविल्या आहेत. आता ग्राहकांना त्यांच्या हातातील मोबाईलमधून सहजरित्या अनेक सेवांचा लाभ घेता येईल. विमाधारकांना काही सेवा व्हॉट्सअपच्या मदतीने मिळतील. त्यांना त्याचा लाभ घेता येईल.

ग्राहकांना ही सेवा प्राप्त करण्यासाठी अगोदर त्यांच्या विमा पॉलिसीची माहिती नोंदवावी लागेल. व्हॉट्सअपवरील सेवांचा फायदा घेण्यासाठी विमाधारकांना एलआयसीच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल www.licindia.in वर त्यांच्या पॉलिसीचा तपशील नोंदवावा लागेल. याठिकाणी विमा पॉलिसीची नोंद केल्यानंतर विमाधारकाला व्हॉट्सअपवर काही सेवा मिळतील.

कोणत्या सुविधा मिळतील?

  • विमाधारकाला किती प्रिमियम बाकी आहे.

  • त्याच्या बोनसची माहिती,

  • पॉलिसीची सध्यस्थिती,

  • त्याला कर्ज मिळेल की नाही,

  • कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया याची माहिती घेता येईल.

  • कर्जावरील थकीत व्याज,

  • प्रिमियम पेड प्रमाणपत्र,

  • ULIP पॉलिसीची सध्यस्थिती,

  • इतर सेवांची माहिती घेता येईल.

कशी मिळवाल ही सुविधा?

  • व्हाट्सअपवर एलआयसीच्या सेवा प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • विमाधारकांना सर्वात अगोदर 8976862090 या क्रमांकावर ‘Hi’ टाईप करुन पाठवावे लागेल.

  • त्यानंतर लागेच एक ड्रॉपडाऊन लिस्ट समोर येईल.

  • त्यात ग्राहकांना 11 पर्यांय मिळतील.

  • या 11 पर्यांय पैकी एखादा पर्याय ग्राहकांना निवडावा लागेल.

  • ग्राहकांना पर्याय क्रमांक टाकून त्याला प्रतित्युर द्यावे

  • त्याआधारे पुढील सेवा त्यांना प्राप्त करता येईल.

  • त्यांना त्यांच्या पर्यायानुसार सेवा मिळतील.

  • एलआयसीचा प्रिमियम कधी आणि किती भरायचा आहे, याची माहिती मिळेल.

नोंदणीकृत क्रमांक आवश्यक

एक गोष्ट निश्चित आहे की, LIC ची सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला एलआयसीकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावरुनच व्हाट्सअपसाठी मॅसेज पाठावायचा आहे. जर तुम्ही नोंदणीकृत नसाल तर पॉलिसी रजिस्टर करण्यासाठी एलआयसीच्या पोर्टलवर जावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

Ajit Pawar: विलासराव देशमुख हे उत्तम मुख्यमंत्री! आता CM पदाच्या शर्यतीत आहात का? अजित पवारांनी स्पष्ट केले मत

Chole Pattice Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार छोले पॅटिस, वीकेंडचा आनंद होईल द्विगुणित

तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

SCROLL FOR NEXT