Loksabha Election Result|Exit Poll Date And Time Esakal
देश

Exit Poll Date And Time: लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल कधी? जाणून घ्या वार, तारीख अन् वेळ

Loksabha Election Result: भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, शेवटचे मतदान झाल्यानंतर ३० मिनिटांनी एक्झिट पोल घोषित केले जावेत.

आशुतोष मसगौंडे

भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याची 1 जून 2024 रोजी सांगता होईल. निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होणार असून, अंतिम निकालापूर्वी, एक्झिट पोलचे निकाल येणार आहेत. ज्यातून संभाव्य विजेत्यांच्या अंदाज लावाला जाईल.

निवडणुका संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोल जाहीर करण्यास परवाणगी आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, शेवटचे मतदान झाल्यानंतर ३० मिनिटांनी एक्झिट पोल घोषित केले जावेत. मतदान सुरू असताना ECI एक्झिट पोलला परवानगी देत ​​नाही. (2024 India elections)

यंदा, लोकसभा निवडणूक 2024 एक्झिट पोल 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता घोषित करण्यात येणार आहेत.

एक्झिट पोलचे निकाल वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांद्वारे घेतले जातात आणि मतदानानंतरच्या मतदारांच्या अभिप्रायावर आधारित असतात.

निवडणुकीच्या विविध पैलूंबद्दल ढोबळ अंदाज घेण्यासाठी एक्झिट पोल मदतीचे ठरतात.

लोकसभा निवडणूक 2024 : एक्झिट पोलची तारीख आणि वेळ

लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल शनिवार, 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 नंतर जाहीर होतील.

एक्झिट पोल 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहणार?

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज वेगवेगळ्या न्यूज चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि यू ट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले जातील.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीची तारीख आणि वेळ

लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. सर्व विजयी उमेदवारांची यादी दुपारपर्यंत निवडणूक आयोगाच्या बेवसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT