When did exit polls started in India? Esakal
देश

EXit Poll 2024: भारतात कधी झाली एक्झिट पोलची सुरूवात? 88 वर्षांपूर्वी 'या' देशात जगात पहिल्यांदाच घेण्यात आले होते EXIT Poll

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील जागांवर आज मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र निवडणूक निकालापूर्वी शनिवारी संध्याकाळी साडेसहापासूनच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरूवात होणार आहे.

याच पार्श्वभूमिवर आपण एक्झिट पोल म्हणजे काय? ते कसे केले जाते? आणि त्याची सुरुवात कशी झाली? याबद्दल माहिती घेणार आहे.

एक्झिट पोल म्हणजे काय?

एक्झिट पोलला निवडणूक सर्वेक्षण म्हणूनही ओळखले जाते. मतदानाच्या दिवशी वृत्तवाहिन्या आणि एक्झिट पोलिंग एजन्सीचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर उपस्थित असतात. मतदान झाल्यानंतर ते मतदारांना निवडणुकीबद्दल काही प्रश्न विचारतात. त्यांनी दिलेल्या उत्तराच्या आधारावर अहवाल तयार केला जातो. या अहवालाच्या मुल्यांकनातून निवडणुकीत मतदारांचा कल कुठे आहे हे लक्षात येते. विशेष म्हणजे एक्झिट पोल सर्व्हेमध्ये फक्त मतदारांचा समावेश करण्यात येतो.

एक्झिट पोल लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126A अंतर्गत येतो. त्याच वेळी निवडणूक आयोग एक्झिट पोलबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्वेही जारी करतो, ज्यामध्ये एक्झिट पोलची पद्धत काय असावी हे सांगितले जाते.

कशी आणि केव्हा झाली एक्झिट पोलची सुरुवात?

भारता ज्या पद्धतीने एक्झिट पोल घेतले जातात त्याच पद्धतीने जगातील विविध देशांत निवडणुकांपूर्वी एक्झिट पोल घेतले जातात.

दरम्यान याच एक्झिट पोलची सुरूवात अमेरिकेत झाली. अमेरिकेत 1936 मध्ये पहिला एक्झिट पोल घेण्यात आला. त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांच्या जोडीन न्यूयॉर्कमध्ये एक निवडणूक सर्वेक्षण केले. त्यावेळी त्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या मतदारांना त्यांनी अध्यक्षपदासाठी कोणत्या उमेदवाराला मतदान केले हे विचारले होते.

जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी घेतलेल्या या एक्झिट पोलमध्ये फ्रँकलिन डी. रुझवेल्ट विजयी होतील असा अंदाज वर्तवला होता, आणि तो अंदाज निवडणुकीच्या निकालात खरा ठरला. यानंतर, एक्झिट पोलचा ट्रेंड जगभरात गाजला. यानंतर 1937 मध्ये ब्रिटनमध्ये आणि 1938 मध्ये फ्रान्समध्ये पहिले एक्झिट पोल घेण्यात आले.

भारतात केव्हा झाला पहिला एक्झिट पोल?

भारतामध्ये 1957 साली दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत भारतात पहिल्यांदा एक्झिट पोल घेण्यात आला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हा एक्झिट पोल घेतला होता. पण त्यावेळी ते एक्झिट पोल म्हणून पूर्णपणे ग्राह्य धरले नाही. यानंतर 1980 मध्ये डॉ. प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा पूर्णपणे एक्झिट पोल घेतला होता.

दरम्यान देशात झालेली 1996 ची लोकसभा निवडणूक एक्झिट पोलच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची होती. त्यावेळी राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर एक्झिट पोलचे प्रक्षेपण करण्यात आले होते. एक्झिट पोलचे अंदाज टीव्हीवर दाखवल्याची ती पहिलीच वेळ होती. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेने हा एक्झिट पोल घेतला होता.

CSDS ने त्यावेळी 1996 च्या लोकसभा निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज बांधला होता. आणि निवडणुकीच्या निकालानंतर तो अंदाज खरा ठरला होता.

त्यावेळी देशात भाजप सर्वात मोठा ठरला होता, पण बहुमतापासून दूर राहिला होता. तर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पण बहुमत नसल्यामुळे त्यांना अवघ्या 13 दिवसांत राजीनामा द्यावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT