pm care fund pm care fund
देश

PM केअरने लसीकरणासाठी दिलेले १०० कोटी कुठे?

आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुधीर काकडे

कोरोना विषाणूमुळे (Covid19) निर्माण झालेल्या महामारीमध्ये देशातील लाखो लोकांचा मृत्यू झाला. याकाळात केंद्र सरकारला आर्थिक मदत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी यावेळी देशातील लोकांना आवाहन केल्यानंतर पीएम केअर फंडमध्ये (PM Care Fund) कोट्यवधी रुपये जमा झाले होते. याच पीएम केअर फंडमधील तब्बल १०० कोटी रुपये व्हॅक्सीन डेव्हलपमेंटसाठी देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाने केली होती. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेला बळ देण्यासाठी, पीएम केअर फंडमधून १०० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली. १३ मे २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने अधिकृत घोषणा करत ही माहीती दिली. काही तज्ञांच्या निदर्शनाखाली या पैशांचं आवश्यक त्या ठिकाणी वितरण करण्यात येईल असही यावेळी पंतप्रधान कार्यालाने सांगितलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आल्याचे क्विंटच्या वृत्तामधून समोर आले आहे.

पीएम केअर फंडाच्या माध्यमातून १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होते, ते पैसे नेमके कुठे गेले हे जाणून घेण्यासाठी काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिकल रिसर्च, केंद्र सरकारचे कोविड व्हॅक्सीन अॅडमीनीस्ट्रेशन सेल यांना माहितीच्या अधिकारातून माहिती मागवण्यात आली. प्रिंसीपल सायंटीफीक अॅडवायजरी ऑफिसकडून या व्यवहारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली नसल्याचे म्हणत हात वर केले. मात्र PMO ने घोषणा केली होती की, सरकारचे प्रिंसीपल सायंटीफीक अॅडवायजरी ऑफिस PM-CARES कडून मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या वापरावर देखरेख करतील. त्यामुळे हे उत्तर आणि PMO ने केलेल्या घोषणेत ताळमेळ नसल्याचं दिसून येतं.

पीएम केअर फंडचं नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी भारतीय नौदलाचे अधिकारी लोकेश बत्रा यांनी १६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या व्ह्रॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन सेलने स्पष्ट केले की असा कोणताच निधी आम्हाला मिळालेला नाही. पंतप्रधान कार्यालय, आयसीएमआर आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांच्याकडून देखी माहिती मागवण्यात आली.

आयसीएमआरने उत्तरात सांगितलं की, पीएम केअरकडून कोणताही फंड मिळालेला नाही. पंतप्रधान कार्यालयाने तर पीएमकेअर फंड ही सर्वसामान्य नागरिकांची मालमत्ता नसल्याचे सांगितले. तर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने देखील पीएम केअरकडून कोणताच फंड मिळाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे पैसे कुठे गेलेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.

“आज RTIकरून 118 दिवस झाले आणि अपीलनंतरचा 85 वा दिवस आहे. सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर (CPIO) तसेच फर्स्ट अपील अथॉरिटी (FAA) कडून कोणताही प्रतिसाद आणि माहिती प्राप्त झाली नाही,” असे बत्रा यांच्या पत्रातून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT