सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्मिती केलेली कोविशील्ड लस, भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सिन लस, रशीयाने तयार केलेली स्पुटनिक व्ही लस आणि अमेरिकेतील मॉडर्ना लस अशा चार लशींना सध्या भारतात मान्यता मिळाली आहे. मात्र, या लशींव्यतिरिक्त आणखीही काही लशी स्पर्धेमध्ये आहेत. कोणत्या आहेत या लशी? याविषयीच आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत.
1. अहमदाबादमधील झायडस कॅडीला ही कंपनी सध्या आपल्या लशीवर काम करत आहे. झाय-कोव्ह-डी असं या लशीचं नाव आहे. बायोटेक्नोलॉजी डिपार्टमेंटसोबत कंपनी याबाबत एकत्र काम करत आहे.
2. अमेरिकेतील 'जॉन्सन अँड जॉन्सन' या कंपनीने विकसित केलेल्या लशीची निर्मिती देखील भारतात होण्याची शक्यता आहे. हैद्राबादमधील बायोलॉजिकल-ई ही कंपनी या लशीची निर्मिती करणार आहे.
3. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्डची निर्मिती केल्याचं आपण जाणतोच. मात्र सीरम आता नोवाव्हॅक्स या अमेरिकन लशीची निर्मिती देखील करत आहे. नुकतंच या लशीच्या पहिल्या खेपेची निर्मिती देखील सुरु झाली आहे.
4. पुण्यातील आणखी एक कंपनी लसनिर्मितीच्या स्पर्धेत आहे. जिनोव्हा बायोफार्मासिटीकल्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अमेरिकेतील HDT Biotech Corporation सोबत मिळून लशीवर काम करत आहे. HGCO19 असं या लशीचं नाव आहे.
5. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीची निर्मिती केल्याचं आपल्याला माहितीच आहे. मात्र, भारत बायोटेक आणखी एक लस तयार करत आहे. अमेरिकेतील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीसोबत एकत्र येत या लशीची निर्मिती केली जात आहे.
6. ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड लसनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकन सहाय्यक कंपनी ऑरो व्हॅक्सीन्सच्या माध्यमातून ही लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑरोबिंदो फार्मा व्हॅक्सिन असं या लशीचं नाव आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.