Corona JN.1 Variant 
देश

Corona JN.1 Variant: "काळजी घेण्याची गरज पण..."; कोरोनाच्या ‘जेएन.१’ उपप्रकाराबाबत WHO चं स्पष्टीकरण

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या ‘जेएन.१’ या विषाणुची यापूर्वीच ‘बीए २.८६’ या प्रकारातील चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून वर्गवारी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Corona JN.1 Variant:  जिनिव्हा: नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर जग कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराच्या पसरत चाललेल्या संसर्गामुळे पुन्हा धास्तावले आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) नमूद केले आहे. अर्थात, काळजी घेण्याची गरज असली तरी सार्वजनिक आरोग्याला धोका कमी असल्याचा दिलासाही ‘डब्लूएचओ’ने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या ‘जेएन.१’ या विषाणुची यापूर्वीच ‘बीए २.८६’ या प्रकारातील चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून वर्गवारी करण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काही आठवड्यांत अनेक देशांत ‘जेएन.१’ चे रूग्ण आढळत असून जगभरातच त्याचा संसर्ग वाढत आहे.

भारतातही केरळमध्ये या उपप्रकाराचा पहिला रूग्ण आढळला आहे. इन्फ्लूएंझा किंवा फ्लूसंदर्भातील सर्व डेटा शेअर करण्याच्या उपक्रमांतर्गत कोरोनाचा ‘जेएन.१’ हा विषाणू ‘बीए २.८६’ चा वंशज असल्याचे अहवाल देण्यात आले आहेत. वेगाने होणारा प्रसार पाहता त्याचा मूळ विषाणुव्यतिरिक्त चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही संघटनेने दिली आहे.

कोरोनाचा ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असली तरी सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित पुराव्यानुसार या उपप्रकाराचा जागतिक आरोग्याला कमी धोका आहे, असा दिलासाही डब्लूएचआने दिला आहे. विशेषत: हिवाळ्याची सुरुवात झालेल्या देशांमध्ये या उपप्रकारामुळे सार्सच्या रुग्णांचे प्रमाण वाढू शकते.

तसेच नेहमीच्या विषाणुजन्य व जिवाणुजन्य संसर्गातही वाढ होऊ शकते. भारतासह अमेरिका, चीन, सिंगापूर आदी देशांत या उपप्रकाराचे रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांत थेट ७५ टक्के वाढू होऊन गेल्या आठवड्यात ५६,०४३ रुग्ण सापडले. भारतात आठ तारखेला केरळमध्ये जेएन.१ चा पहिला रुग्ण आढळला. तेथील ७९ वर्षीय महिलेला या उपप्रकाराचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. (Latest Marathi News)

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

‘जेएन.१’ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी देशातील राज्यांमधील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे, राज्यांना दक्षतेच्या सूचनाही दिल्या. केंद्राकडून राज्यांना सर्व ती मदत दिली जात असल्याचे सांगून आपण सावध राहण्याची गरज असली तरी घाबरण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी केल्या आहेत.

कोरोनाचा ‘जेएन.१’ विषाणू काय आहे?

कोरोनाच्या ‘बीए.२.८६’ या प्रकाराचा ‘जेएन.१’ उपप्रकार आहे. पिरोला म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या ‘बीए.२.८६’ प्रकारात स्पाईक प्रोटिनमध्ये ३० पेक्षा अधिक उत्परिवर्तने झाली होती. त्यामुळे, प्रतिकारशक्ती भेदण्याची अधिक क्षमता या प्रकारात निर्माण झाली. त्यामुळे, या प्रकारावर व त्यातून निर्माण होणाऱ्या उपप्रकारावर शास्त्रज्ञांचे लक्ष होते. ‘जेएन.१’ ची लक्षणे कोरोनाच्या इतर प्रकारांसारखीच आहेत. कोरोनावरील सध्याची उपचारपद्धती व अद्ययावत लसीमुळे या उपप्रकाराच्या संसर्गाला आळा बसण्याचा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

देशात २१ रुग्णांची नोंद

कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराचा संसर्ग झालेले एकूण २१ रूग्ण आत्तापर्यंत देशात आढळले आहेत. त्यापैकी १९ रूग्ण एकट्या गोव्यात सापडले असून केरळ व महाराष्ट्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली. दरम्यान, मे २०२१ पासून देशात एका दिवसात प्रथमच कोरोनाचे उच्चांकी ६१४ रुग्ण आढळले आहेत. सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या २,३११ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT