दुबईत सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषद 2023 (COP28) मध्ये एका भारतीय मुलीने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला होता. अवघ्या 12 वर्षांची लिसिप्रिया कंगुजम (Licypriya Kangujam) ही मणिपूरची रहिवासी आहे. ती एक हवामान कार्यकर्ता आहे. COP28 च्या एका कार्यक्रमादरम्यान ती पोस्टर घेऊन स्टेजवर चढली होती.
लिसिप्रिया स्टेजवर एक पोस्टर हातात घेऊन स्टेजवर चढली होती. त्यावर लिहीलं होतं की, "जीवाश्म इंधन (Fossil Fuels) बंद करा, आपली पृथ्वी आणि आपलं भविष्य वाचवा."
लिसिप्रिया हिने स्टेजवर गेली आणि तीने जीवाश्म इंधनाच्या वापराचा विरोध करत एक छोटं भाषण देखील दिलं. या भाषणानंतर COP28 चे डायरेक्टर जनरल अॅम्बेसडर माजिद अल सुवेदी यांनी देखील या भाषणाची स्तुती केली आणि लोकांना टाळ्या वाजवण्यास सांगितलं. मात्र या भाषणानंतर लिसिप्रियाला COP28मधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले.
यानंतर जनरल अॅम्बेसडर यांन लिसिप्रिया ची स्तुती देखील केली, ते म्हणाले, "मी या मुलीच्या उत्साहाचे कौतुक करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना तिच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवण्याची विनंती करतो."
लिसिप्रिया कंगुजमने तिच्या एक्स अकाउंटवर पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना टॅग करत त्यांनी लिहिले, “या विरोधानंतर त्यांनी मला 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ ताब्यात घेतले. आजच्या हवामान संकटाचे प्रमुख कारण असलेल्या जीवाश्म इंधनाच्या फेजआऊटची मागणी करणे हा माझा एकमेव गुन्हा होता. नंतर मला COP28 मधून बाहेर काढण्यात आले."
लिसिप्रियाने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, "जीवाश्म इंधनाचा विरोध केल्याबद्दल माझा बॅज जप्त करण्याचे कारण काय आहे? जर तुम्ही जीवाश्म इंधनाच्या विरोधात उभे असाल तर तुम्ही मला पाठिंबा द्यावा. तुम्ही माझा बॅज ताबडतोब रीलिज केला पाहिजे. हे संयुक्त राष्ट्र कॅम्पसमध्ये बाल हक्कांचे उल्लंघन आणि दुरूपयोग केला जात आहे, जे संयुक्त राष्ट्रांच्या तत्वांच्या विरुद्ध आहे. मला संयुक्त राष्ट्रात प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे."
जीवाश्म इंधनाचा वापर संपवण्याच्या मुद्द्यावर COP28 मध्ये चर्चा सुरू आहे. जवळपास 200 देश या समस्येचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात सामील झाले आहेत. यावर्षी दुबई येथे होणाऱ्या हवामान परिषदेत 190 देशांतील सुमारे 60,000 प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत.
2 ऑक्टोबर 2011 रोजी जन्मलेली लिसिप्रिया कंगुजम 'द चाइल्ड मूव्हमेंट'ची संस्थापक आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती यासाठी काम करत आहे. लिसिप्रिया ही जागतिक स्तरावरील सर्वात तरुण हवामान कार्यकर्त्यांपैकी एक आहे. तिने 2019 मध्ये स्पेनमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (COP25) जागतिक नेत्यांना संबोधित केले होते.(Know Who is Lycipria Cangujum?)
- 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय चिल्ड्रन पीस अवॉर्ड
- 2019 राइजिंग स्टार ऑफ अर्थ डे नेटवर्क
- 2020 ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड
- 2020 टीएन खुशू मेमोरियल अवॉर्ड
- फोर्बर 30 अंडर 30 स्पेशल मेन्शन 2021
- दिल्ली सरकारकडून 2021 साली आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार
लिसिप्रिया ही हवामान कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यापासून प्रेरित आहे. तिने जुलै 2018 मध्ये हवामान बदलावर काम सुरू केले. 21 जून 2019 रोजी, लिसिप्रियाने भारतात 'क्लायमॅट चेंज लॉ' आणण्यासाठी संसद भवनाबाहेर एक आठवडा घालवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.