who is colonel manpreet singh martyred in Anantnag encounter full story jammu kashmir marathi news  
देश

Colonel Manpreet Singh : दोन चिमुकल्यांना मागे सोडून देशासाठी शहीद; कोण होते कर्नल मनप्रीस सिंह?

रोहित कणसे

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्करातील एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपअधिक्षक शहीद झाले आहेत. या घटनेनंतर देशभारता शोक व्यक्त केला जात आहे. शहीद कर्नल मनप्रीत यांच्या घरी जेव्हा ही बातमी पोहचली तेव्हा कुटुंबीयांसोबतच जवळपास राहणाऱ्या लोकांना देखील अश्रू रोखणे कठीण होऊन बसलं.

कर्नल मनप्रीत यांचे बंधू संदीप सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पाच ते सहा दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांना बुक बाइडिंगचं काहीतर काम करून घ्यायचं होतं. काल (बुधवारी) फोन केला तर त्यांनी उचलला नाही. ते नेहमीत फोनचे उत्तर देत असत, मात्र यावेळी त्यांनी फोन उचलला नाही आणि नंतर ते शहीद झाल्याची बातमी समजली. आज तकने याबद्दलचे वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नल मनप्रीत मागील चार वर्षांपासून अनंतनाग येथे पोस्टेड होते, ते 19RR CO शीख रेजिमेंटमध्ये सेवा देत होते. त्यांचे वडिल देखील सेनेत होते. २०१४ मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.

२०१६ मध्ये झालं होतं लग्न

संदीप सिंह यांनी सांगितलं की भैया त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करत होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब मोहाली येथे वास्तव्यास आहे, मात्र वहिणी जगमीत ग्रेवाल शिक्षीका आहेत. त्यांची पोस्टिंग मोरनी येथील सरकारी शाळेत आहे. त्यामुळे त्या मुलगा कबीर सिंह (६ वर्ष) आणि मुलगी वाणी (अडीच वर्ष) यांच्यासोबत आपल्या वडिलांच्या घरी म्हणजेत पंचकूला येथे राहतात. त्यांच्या पोस्टिंग असलेली शाळा येथून जवळच आहे. वहिणींना पहिल्यांदा भैय्या शहीद झाल्याबद्दल सांगण्यात आलं नव्हतं. त्यांना थोडं उशिराने सांगण्यात आलं. मनप्रीत सिंह यांचं २०१६ साली पंचकूला येथे राहणाऱ्या जगमीत कौर यांच्यासोबत लग्न झालं होतं.

मनप्रीत यांचे बंधू संदीप यांनी सांगितलं की २००३ साली सीडीएस परीक्षा पास करून ट्रेनिंगनंतर भाई २००५ मध्ये लेफ्टनंट बनला. मनप्रीत सिंह यांनी ट्रेनिंगसाठी जातना सांगितले होते की, मला भीती काय असते ते ठाऊक नाही, मरण मागे सोडून मी भारत मातेच्या सेवेसाठी भारतीय सैन्यात भरती होो आहे. मार्च २०२१ मध्ये कर्नल मनप्रीत सिंह यांना त्यांच्या शौर्यासाठी गॅलेंट्री सेना मेडेलने गौरवण्यात आले होते. मनप्रीत यांना लहानपणापासून ऑफिसर बनण्याची इच्छा होती. मनप्रीत यांचे वडिल लखमीर सिंह हे देखील १२ शिख लाइट इन्फेंट्रीमधून हवालदार म्हणून रिटायर झाले होते.

नेमकं झालं काय?

जम्मू-कश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात लपलेल्या दहशतवाद्याना पकडण्यासाठी सेना आणि पोलिसांची टीम सर्च ऑपरेशन करत होती. हे ऑपरेशन कर्नल मनप्रीत सिंह लीड कत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर फायरिंग केली, या चकमकीत सेनेचे दोन अधिकारी कर्नल मनप्रीत सिंह, बटालियन कमांडर मेजर आशीष धोनैक आणि डीएसपी हुमायूं भट शहीद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT