केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी स्मशानभूमीत (Cemetery) प्रचार वाहनांचं पूजन करून निवडणूक प्रचार सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवार विजयासाठी कडाक्याच्या उन्हात घाम गाळत प्रचार करताना दिसत आहेत.
जनतेची मतं मिळविण्यासाठी नेतेमंडळी घरोघरी संपर्क साधून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडं कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे (KPCC) कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी स्मशानभूमीतून आपला निवडणूक प्रचार सुरू करण्याची घोषणा केलीये.
चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत सतीश जारकीहोळी.. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी स्मशानभूमीत (Cemetery) प्रचार वाहनांचं पूजन करून निवडणूक प्रचार सुरू करण्याची घोषणा केली आहे.
अशुभ राहूच्या काळात उमेदवारी अर्ज भरणार का? असा सवाल केला असता त्यांनी सांगितलं, 'प्रत्येक दिवस हा राहू काळ असतो. जर 13 ते 20 एप्रिल दरम्यान राहुकाळ असेल तर मी नक्कीच माझा उमेदवारी अर्ज दाखल करेन. राहुकाळ हा फक्त एक भ्रम आहे. काही लोक माझ्यावर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत आहेत. पण, ते चुकीचं आहे.'
यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, मी राहूकाळात किंवा स्मशानात पूजा करून नवीन प्रवासाला सुरु करत असतो. गेल्या तीन दशकांपासून मी हे करत आहे. महात्मा बसवेश्वर, भगवान बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मार्ग दाखवला, त्या मार्गावर मी चालत आहे. यावेळी जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील 12 पैकी 10 विधानसभेच्या जागा काँग्रेस जिंकणार असल्याचाही दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी सतीश जारकीहोळी हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळं चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांची प्रतिमा हिंदुद्वेषी नेता अशी बनलीये. जारकीहोळी म्हणाले, हिंदू हा शब्द भारतीय नसून तो परदेशी असलेल्या फारसी या भाषेतील आहे. हिंदू हा शब्द बळजबरीनं आमच्यावर थोपवला जात आहे. तसं पाहायला गेलं तर हिंदू या शब्दाला काहीच अर्थ नाही आहे. जो शब्द आपल्या देशातील नाही त्या शब्दासाठी आमच्यावर दबाव का टाकला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. हिंदू हा शब्द परकीय आहे, त्याबद्दल आपल्या देशात चर्चाच व्हायला नको, असंही ते म्हणाले होते.
1 जून 1962 रोजी जन्मलेले जारकीहोळी हे बेळगावमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांनी 22 डिसेंबर 2018 ते 23 जुलै 2019 या कालावधीत कर्नाटक सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री म्हणूनही काम केलं. ते सध्या कर्नाटक विधानसभेचे सदस्य आहेत. शिवाय, ते 2008 पासून यमकनमर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. एचडी कुमारस्वामी मंत्रिमंडळात वन आणि पर्यावरण मंत्री होते. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात ते उत्पादन शुल्क मंत्रीही होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.