Mallikarjun Kharge News sakal
देश

Mallikarjun Kharge: कोण आहेत मल्लिकार्जून खर्गे?

गांधी घराणं आणि खर्गे यांचं नातं काय?

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे आलेलं आहे. परंतु काँग्रेस पक्षात मल्लिकार्जून खर्गे यांचं स्थान काय? गांधी घराण्याशी त्यांचं नातं कसं आहे? याबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता आहे.

मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद येईल, अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. मल्लिकार्जून खर्गे हे मूळचे कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातील वारावत्ती इथले. गुलबर्गा येथेच न्यूटन विद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर शासकीय महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे कायद्याचं शिक्षण घेतलं आणि वकिली व्यवसायही केला. एक उच्च शिक्षित, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून खर्गेंकडे पाहिलं जातं. (who is Mallikarjun Kharge?)

मुळात विद्यार्थी दशेपासून खर्गेंना राजकारणाची आवड होती. महाविद्यालयात असतांना विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पदार्पण केलं. शिवाय ते दलित असल्याने सामाजिकदृष्ट्या काँग्रेससाठी ती जमेची बाजू ठरु शकते. पडझड झालेल्या काँग्रेसच्या भिंतींची खर्गे डागडुजी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मल्लिकार्जून खर्गे यांनी 1969मध्ये काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केलं. 1972 मध्ये ते पहिल्यांचा कर्नाटकातून निवडून आले आणि आमदार झाले. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेत पाय ठेवला. त्यापूर्वी त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबियांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून खर्गे यांची पक्षामध्ये ओळख आहे. खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली. कर्नाटकमधील दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात अनेकवेळा मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव चर्चिलं गेलं. काँग्रेस पक्षात वजन असल्याचे त्यांची वर्णी लागेल, असं वाटत असतांना बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची संधी हुकत गेली. परंतु त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही.

 2014मध्ये लोकसभेत खर्गे यांना काँग्रेस पक्षाने गटनेता म्हणून निवडले. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्याजागी पक्षाने खर्गेंना राज्यसभेवर संधी दिली.

खर्गे यांच्याकडे 16 फेब्रुवारी 2021 पासून 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद होतं. 17 जून 2013 ते 26 मे 2014 या दरम्यान त्यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद होतं. 29 मे 2009 ते 16 जून 2013 या कालावधीमध्ये खर्गेंकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी होती. पक्षाने खर्गेंना कायम एका विशिष्ट मर्यादित उंचीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता काँग्रेसच्या पडत्या काळात खर्गे हुकूमी एक्का ठरु शकतात का? हे पाहाणं औत्सुक्याचं आहे. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा सभागृहात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर हल्ला झाला, पक्षाला विरोधकांकडून अडचणीत आणण्याचे प्रय़त्न झाले, तेव्हा मात्र खर्गे ढाल होऊन पक्षासाठी लढत राहिले.

सध्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षात घमासान सुरु आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव मागे पडलं आहे. मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव पुढे आलेलं असून त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आजच्या काळात अशा नेत्यांची गरज आहे, असं म्हणत गहलोत यांनी खर्गे यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं.

विशेष म्हणजे काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या गटामध्ये अध्यक्षपदावरुन फूट पडली. G-23 गटाने मल्लिकार्जून खर्गे यांना पाठिंबा दिलाय. या गटातील सदस्यांनी खर्गे यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली. काँग्रेसमधल्या वरिष्ठ ३० नेत्यांनी खर्गे यांना पाठिंबा दर्शवला आहे. मल्लिकार्जून खर्गे यांच्या विरोधात शशी थरुर मैदानात आहेत. परंतु खर्गे यांचा चेहरा, संयमी राजकारण, दीर्घकालीन निष्ठा; यामुळे सध्या तरी खर्गे यांचं पारडं जड आहे. त्यांच्याकडूनच काँग्रेसच्या जुन्या वाड्याची डागडूजी होईल, अशी अपेक्षा काँग्रेसजन व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT