एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर जाणून घेऊया द्रौपदी मुर्मू कोण आहेत.
आदिवासी समाजातील कुणी राष्ट्रपती आजवर भारतात झाले नाही, त्यामुळे आम्ही आदिवासी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचं ठरवलं. त्यानुसार द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एकमत झालं," असे नड्डांनी यावेळी सांगितलं.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू ?
मुर्मू यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि नंतर ओडिशाच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वर्षी भाजपच्या एसटी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्या भाजपच्या तिकिटावर मयूरभंज (2000 आणि 2009) मध्ये रायरंगपूरमधून दोन वेळा आमदार होत्या.
द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. तत्पूर्वी1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या.
नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली.
त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ (2015-2021) पूर्ण केला आहे.
देशाच्या नवीन राष्ट्रपतीची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच नावनोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.