देश

Jammu Kashmir Election Results 2024: कोण आहेत जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला? एवढी आहे संपत्ती...

संतोष कानडे

Omar Abdullah: जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचा विजय झाला आहे. दुपारी बारा वाजल्यानंतरच आघाडीने निर्णायक बहुमताकडे वाटचाल केली होती. दुपारी ४ वाजताच्या अपडटे्सनुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजप- २९, नॅशनल कॉन्फरन्स- ४२, काँग्रेस- ६, पीडीपी-४ आणि इतर ९ उमेदवार जागांवर आघाडीवर होते. एनसीचे नेते ओमर अब्दुल्ला तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी ते २००९ ते २०१५ या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दोन जागांवरुन निवडणूक लढवली होती. गंधरबल आणि बदगाम या मतदारंसघातून अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानुसार त्यांची नेटवर्थ काश्मीरमधल्या इतर राजकीय नेत्यांपेक्षा कमी आहे. त्यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे ना कार. शिवाय त्यांचा कोणता व्यवसायदेखील नाही.

केवळ ९५ हजार रुपये कॅश

ओमर अब्दुल्ला यांचा खर्च नेमका कसा भागतो, हे पाहाणंही महत्त्वाचं आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे ५४ लाख रुपयांची संपत्ती आहे. परंतु नगदी केवळ ९५ हजार रुपये आहेत. यासह काही बँकांमध्ये त्यांनी फिक्स डिपॉझिट केलेले आहेत. यामध्ये एचडीएफी बँकेत १९ लाख १६ हजार रुपये, एसबीआय बँकेत २१ हजार ३७३, एचडीएफसी श्रीनगर बँकेत २ लाख २० हजार ९३० रुपये, जे एँड बँकेत १ लाख ९१ हजार ७४५ रुपये. तसेच त्यांच्याकडे ३० लाख रुपयांचे दागिने आहेत.

कोण आहेत ओमर अब्दुल्ला?

ओमर अब्दुल्ला सध्या ५४ वर्षांचे आहेत. जे जम्मू-काश्मिरातील एक ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचे चिरंजीव आहेत. स्वतः ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. २००९ ते २०१५ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते.

ओमर अब्दुला यांचा जन्म इंग्लंडच्या रोचफोर्ड येथे झाला. त्यांचे आजोबो शेख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री होते. १९९९८ मध्ये ओमर यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तेव्हा ते केवळ २८ वर्षांचे होते. याच वयात ते थेट लोकसभा जिंकले होते.

२००२ मध्ये ओमर हे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रदेशाध्यक्ष बनले. २००९ मध्ये त्यांनी जम्मू काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

ओमर अब्दुल्लांचं प्राथमिक शिक्षण जम्मू-काश्मीरमध्ये झालं. श्रीनगरच्या Burn Hall School मध्ये ते शिकले. ही शाळा राज्यात सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. शालेय शिक्षणानंतर ओमर अब्दुल्ला मुंबईतल्या Sydenham College of Commerce मधून ते बीकॉम झाले. त्यानंतर ओमर यांनी स्कॉटलँडच्या University of Strathclyde येथून MBA केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT