Karnataka Laddu Mutya Baba esakal
देश

मूळ लड्डू मुत्या बाबा कोण होते? Instagram वर व्हायरल झालेला बाबा खरा की खोटा? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

सकाळ डिजिटल टीम

दिव्यांग असलेला लड्डू मुत्या फिरणारा पंखा बंद करून विभूतीप्रमाणे भक्तांच्या कपाळावर धूळ फेकत आहे.

Karnataka Laddu Mutya Baba Viral Fan Baba : कोणताही सोशल मीडिया किंवा इन्स्टाग्राम उघडलात, तर त्यावर लड्डू मुत्याचे रील्स दिसून येत आहेत. दिव्यांग असलेला लड्डू मुत्या फिरणारा पंखा बंद करून विभूतीप्रमाणे भक्तांच्या कपाळावर धूळ फेकत आहे. दोन माणसे खुर्चीवर बसलेल्या लड्डू मुत्यांना धरतात. मग, लड्डू मुत्या फिरत्या पंख्याला थांबवून त्याची धूळ भस्म म्हणून फेकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

पण, खरं तर हा लड्डू मुत्या (Laddu Mutya Baba) म्हणजे हा बाबा खरा लड्डू मुत्या नाही. हा दिव्यांग खरा बाबा नाही. लड्डू मुत्याच्या खऱ्या भक्तांनी या दिव्यांग लड्डू मुत्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. मग खरे लड्डू मुत्या कोण? त्यांनी कोणता चमत्कार केला? लड्डू मुत्या म्हणजे ही दिव्यांग व्यक्ती कोण आहे? त्याची संपूर्ण माहिती येथे आहे.

Karnataka Laddu Mutya Baba

खरे लड्डू मुत्या कोण?

बागलकोट तालुक्यातील सिमीकेरीजवळ (Simikeri Bagalkot) मूळ लड्डू मुत्यांचा मठ होता. लड्डू मुत्यांनी दोन ऑगस्ट १९९३ ला समाधी (लिंगैक्य) घेतली. लड्डू मुत्या डोक्याला, अंगाला गोणपाटाचे पोते बांधत असत. या गोणपाटाच्या पोत्याला ते पीळ देऊन त्याला मोठ्या दोरीसारखे बनवत. ते त्याला ‘लड्ड’ असेही म्हणत. यावरुनच त्यांचे नाव लड्डू मुत्या (बाबा) असे पडले. या दोरीने ते भक्तांना फटकेही देत असत. गंमत म्हणजे असे फटके खाणे म्हणजे नशीब फळफळणे असेही भक्तांना वाटत असे.

Karnataka Laddu Mutya Baba

लड्डू मुत्यांचं खरं नाव काय?

लड्डू मुत्यांचे मूळ नाव मल्लय्या असे होते. १९७०-१९९० च्या दशकात बागलकोट आणि विजापूरसह उत्तर कर्नाटकात लड्डू मुत्याची एक चमत्कारी व्यक्ती म्हणून पूजा केली जात असे. ते काय सांगतील ते खरे होत असे, अशी त्यांच्या भक्तांची भावना होती. ते कोणत्याही दुकानात गेले की, दुकानमालकाला मोठा नफा मिळत असे. त्यांच्या नशिबाचे दार उघडत होते.

Karnataka Laddu Mutya Baba

सिमीकेरीमध्ये आहे लड्डू मुत्यांचा मठ

ज्यांच्या घरात ते गेले घरवाल्यांना देवी आशीर्वाद देत असे. त्यांच्या कुटुंबाची भरभराट होत असे, अशीही भक्तांची श्रद्धा बनली होती. तसेच लड्डू मुत्यांचा मठ फक्त सिमीकेरीमध्ये आहे. बाकी कुठेच नाही. कोठेही शाखा अथवा मठ नाही. इतर मठांमधून स्वामीजींची नियुक्ती करण्यात आलेली नाही. लड्डू मुत्या हे सिमीकेरी येथील होते. त्यांचा पुतळाही तेथे आहे. भाविक तेथे येऊन दर्शन घेतात. प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला येथे प्रसाद वाटप केला जातो.

Karnataka Laddu Mutya Baba

मूळ लड्डू मुत्यांचा होत आहे अपमान

त्यामुळे आताचा ‘फॅन बाबा’ लड्डू मुत्याचा मूळ लड्डू मुत्याशी काहीही संबंध नाही. आता अचानक ही मतिमंद व्यक्ती लड्डू मुत्याच्या रूपात जन्माला येते. पंखा बंद करून चमत्कार दाखविते. मूळ लड्डू मुत्यांच्या भक्तांनी आवाहन केले आहे की, रिल्समधील बनावट लड्डू मुत्यापासून सावध राहा. बनावट लड्डू मुत्या व त्याचे साथीदार पैसे मिळवून नागरिकांची फसवणूक करत आहेत. लिंगैक्य झालेल्या मूळ लड्डू मुत्यांचा हा अपमान आहे, असा संताप भक्त आणि मठाच्या प्रशासकीय मंडळाने व्यक्त केला आहे.

Karnataka Laddu Mutya Baba

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT