Who opened the lock of Ram Mandir 
देश

राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय

मशीदीला कुलूप लावल्यानंतर देशात तनावाचे वातावरण होते. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होता. २२-२३ ते डिसेंबरच्या दरम्यान मशीदीच्या गाभाऱ्याला कुलूप असल्याने मूर्ती ठेवण्यात आली. तेथे पूजा देखील सुरु होती. यामुळे मुस्लिमांमध्ये प्रचंड संताप होता.

Sandip Kapde

Who opened the lock of Ram Mandir

देशभरात राम मंदिर उद्घाटनाची चर्चा आहे. गेली अनेक वर्ष राम मंदिरावर चर्चा सुरु होती. राम मंदिरासाठी अनेक आंदोलने, लढे झाले. अनेकांनी आपला जीव देखील गमावला. बाबरने राम मंदिराचा विध्वंस करुन बाबरी मशीद बांधली. हा वाद सर्वोच्च न्यायालयात देखील सुरु होता. त्यानंतर बाबरी मशीदीला कुलूप लावण्यात आले. रामजन्मभूमी किंवा बाबरी मशीदच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण होते आणि या वातावरणात निरीक्षक मोहम्मद इब्राहिम यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल दिला होता. अहवालातील माहितीनुसार बाबरी मशीदीची चावी मुस्लिमांकडे असायची. बाबरी मशीदीत नमाज पठण होत नव्हते. पोलीस कुलूप उघडू देत नव्हते, शुक्रवारी दोन-तीन तास स्वच्छता केली जात असे आणि सकाळची नमाजही अदा केली जात होती, त्यानंतर कुलूप लावले जात असे. १९४८ मधील सरकारी कागदपत्रांमध्ये या कुलूपाचा उल्लेख आढळतो.

मशीदीला कुलूप लावल्यानंतर देशात तनावाचे वातावरण होते. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होता. २२-२३ ते डिसेंबरच्या दरम्यान मशीदीच्या गाभाऱ्याला कुलूप असल्याने मूर्ती ठेवण्यात आली. तेथे पूजा देखील सुरु होती. यामुळे मुस्लिमांमध्ये प्रचंड संताप होता. वाद चिघळतोय हे लक्षात येताच पोलिसांनी संपूर्ण इमारतीचा ताबा घेतला. स्थानिक प्रशासनाने फैजाबाद म्युनिसिपल बोर्डाच्या अध्यक्षा प्रिया दत्त राम यांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली आणि त्यांनी गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गेटला कुलूप लावले.

मात्र १ फेब्रुवारी १९८६ मध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना कुलूप उघडण्यात आले. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी घटना होती. राजीव गांधी हे काँग्रेसचे पहिले अपघाती पंतप्रधान होते. संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन आणि नंतर त्यांची आई इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले.

एके दिवशी राम मंदिराचे कुलूप उघडण्याचे ठरवण्यात आले. याचे सुत्रधार राजीव गांधींचे चुलत भाऊ अरुण नेहरू होते. ते तत्कालीन अंतर्गत सुरक्षा मंत्री होते. राम मंदिराचे कुलूप उघडण्याची पार्श्वभूमी जाणून घेण्याची देखील आवश्यकता आहे. राजकीय आयुष्यात राजीव गांधी यांची अग्निपरीक्षा शाहबानो प्रकरणात होती. इंदूरची रहिवासी असलेली शाह बानो ही पाच मुलांची आई होती, तिला तिचा पती मोहम्मद अहमद खान याने घटस्फोट दिल्यानंतर घरातून हाकलून दिले होते. शाह बानो आणि तिच्या मुलांच्या देखभालीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयाने शाह बानोच्या बाजूने निकाल दिला. या निकालाचे राजीव गांधी यांनी स्वागत केले. राजीव सरकारचे मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी संसदेत या निर्णयाच्या समर्थनार्थ भाषण केले होते. राजीव गांधींनी त्यांचे कौतुक देखील केले, मात्र आपण हे राजीव गांधींच्या सांगण्यावर केल्याचे सांगितले. मात्र यावेळी राजीव गांधी कैचीत पकडल्या गेले. मौलानांच्या दबावाखाली राजीव गांधी झुकले. यानंतर सुप्रीम कोर्टात कायदा करत त्यांनी कोर्टाचा निर्णय पलटवला. (Rajiv Gandhi News in Marathi)

भाजपने हा मुद्दा उचलून धरला. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेने देशभारत आंदोलने केली. धर्माच्या आधारावर दोन कायदे का? असा प्रश्न हिंदू संघटनांनी उपस्थित केला होता. देशात धार्मिक आधारावर राजकीय वातावरण देखील चांगलच तापलं होतं.

यानंतर १ फेब्रुवारी १९८६ ला राम मंदिराचे कुलूप उघडण्यात आले. ५ फेब्रुवारीला महिला बील आणण्यात आले. म्हणजे या पाच दिवसांत भारतीय राजकारणाची दोन ऐतिहासिक प्रकरणे लिहिली गेली. या ५ दिवसांच्यामध्ये म्हणजे ३ फेब्रुवारीला आरिफ मोहम्मद यांनी राजीव गांधी यांची भेट घेतली. राम मंदिराचे कुलूप उघडणे ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे मोठे संकट निर्माण होऊ शकते. मुस्लिम महिला विधेयक बाजूला पडेल आणि मुस्लिम रस्त्यावर येतील, अशी भीती आरिफ मोहम्मद यांनी व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले की, कुलूप उघडण्याबाबत मी मुस्लिम नेत्यांना माहिती दिली होती, मी स्वतः अली मियाँ यांच्याशी बोललो होतो आणि ते विरोध करणार नाहीत.

राजीव गांधी यांनी एका डावात हिंदू आणि मुस्लिम वोटींग बँलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला.  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष अली मियाँ यांना शाहबानोच्या मुद्द्यावर राजीव गांधींचा पाठिंबा हवा होता आणि राम जन्मभूमीच्या प्रश्नावर राजीव गांधींना अली मियाँचा पाठिंबा हवा होता. राजीव गांधींचा डाव यशस्वी झाला. 3 फेब्रुवारी रोजी अली मियाँ यांचे एक विधान लखनौ येथून प्रकाशित कौमी आवाज वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी मुस्लिमांना कुलूप उघडण्यास जास्त महत्त्व देऊ नये असे सांगितले होते. राजीव गांधी आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्यात झालेल्या सौदेबाजीचा एक मोठा पुरावा म्हणजे त्यांच्या हयातीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कुलूप उघडण्याच्या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन किंवा विरोध झाला नाही.
राम मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी राजीव गांधी अग्रेसर होते. कोर्टाचा आदेश अन् सरकारची कारवाई यांची वेळेचं टाईमिंग बघितलं हे आपल्या लक्षात येईल.
 
न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी १ फेब्रुवारी १९८६ रोजी हा निर्णय दिला तेव्हा संध्याकाळचे ४:४० वाजले होते आणि ठीक ४० मिनिटांनी ५:२० वाजता वादग्रस्त जागेचे कुलूप उघडण्यात आले. म्हणाजे न्यायालयाच्या आदेशानंतर ४० मिनिटात कुलूप उघडण्यात आले. कुलूप उघडण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करणारे वकील उमेशचंद्र पांडे यांनी सुद्धा स्पष्ट केले होते की सर्व काही इतक्या लवकर होईल याची त्यांना कल्पना नव्हती.

जिल्हा न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी कुलूप उघडण्याचा आदेश दिला होता. पण यामगे देखील त्यांनी वेगळाच दावा केला होता. त्यांच्या आत्मचरित्रातही त्या उल्लेख आहे. त्यांनी स्वतः बजरंगबली हनुमानजींची काळ्या माकडात झलक पाहिली आणि त्यांनी स्वतः कुलूप उघडण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी कधीही आपल्या भक्ती भावना लपवल्या नाहीत. आपल्या निर्णयात त्यांनी योग्य वस्तुस्थिती आणि तात्काळ परिस्थिती लक्षात घेऊन कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते.

आपल्या निर्णयात न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी स्पष्ट केले होते की, “मुख्य विचार हा होता की प्रतिवादींना कुलूप उघडण्याचे निर्देश द्यायचे की नाही, हे कुलूप कधी आणि कोणाच्या आदेशाने बसवले गेले हे त्यांना माहीत नव्हते. मंदिराच्या गेटचे कुलूप उघडले तरी मूर्तींची सुरक्षा आणि शांतता राखली जाऊ शकते, असे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी स्पष्टपणे मान्य केले आहे."

राम मंदिराचे कुलूप कुणी उघडले असा प्रश्न आजही निर्माण होतो. ते काळे माकड ज्यामध्ये हनुमानजींची प्रतिमा पाहून न्यायाधीश के.एम.पांडे यांनी कुलूप उघडण्याचा आदेश दिला की या प्रकरणात राजीव गांधी पडद्यामागे सक्रिय होते. राजीव गांधींनी राम मंदिराच्या कुलूपबंदीबाबत मुस्लिम संघटनांशी करार केला होता, त्या करारांतर्गत मुस्लीम संघटनांनी कुलूप उघडण्याचा मुद्द्यावर आंदोलन करायचे नव्हते, त्या बदल्यात राजीव गांधींना शाहबानो प्रकरणामध्ये त्यांना मोठी सवलत द्यावी लागली होती. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT