Who was Alan Hume who founded Congress party foundation day What was his intention 
देश

काँग्रेसची स्थापना करणारे अ‍ॅलन ह्युम कोण होते? त्यांचा हेतू काय होता?

काँग्रेसचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचं योगदान आपल्या सर्वांनाच माहितीये. पण, काँग्रेसची स्थापना एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती हे अनेकजणांना माहिती नसतं.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचं योगदान आपल्या सर्वांनाच माहितीये. पण, काँग्रेसची स्थापना एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती हे अनेक जणांना माहिती नसतं. काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूम या माजी सनदी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती.

ह्युम यांचा काँग्रेस स्थापनेमागचा विचार भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यावा असा नक्कीच नव्हता. त्यामुळे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीयांसाठी राजकीय संघटना का स्थापन केली? याची ३ प्रमुख कारणं आपल्याला सांगता येतील. ( Who was Alan Hume who founded Congress party foundation day What was his intention)

1. १८५७ च्या उठावानंतर देशात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढत होता. त्यामुळे कधीही जनतेच्या असंतोष उफाळून येण्याची शक्यता होती. त्याला एका ठिकाणी मार्ग करून देण्यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली.

2. सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा. भारतीय आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा असा एक विचार त्यामागे होता.

3.भारतात सामाजिक आणि राजकीय सुधारणा व्हावी अशी ह्युम यांची भूमिका होती. भारतात राजकीय चळवळ उभारली जावी असं ह्युम यांना वाटायचं. ह्युम यांच्या पुढाकारामुळे एक मोठ्या पक्षाची पायाभरणी झाली आणि पुढे तिनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. असे असले तरी ॲलन ह्यूम यांच्या हेतूबाबत भारतात आणि ब्रिटनमध्येही शंका घेतली जाते.

अ‍ॅलन ह्युम कोण होते?

अॅलन ह्युम यांचा जन्म ६ जून १८२९ मध्ये स्कॉटलँडमध्ये झाला. त्यांनी मेडिकल सायन्समधून पदवी घेतली होती. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी बंगाल प्रांतातून प्रशासकीय कामाची सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बंगाल प्रांतात प्राथमिक शिक्षण मोफत केल्याचं सांगितलं जातं. १८५७ च्या स्वातंत्र्याच्या पहिल्या उठावाविरोधात त्यांनी एका सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं.

ह्युम हे १८८२ साली ब्रिटिश सरकारच्या सेवेतून मुक्त केले. त्यानंतर त्यांनी भारतीयांची एक राजकीय संघटना असावी असं मत प्रदर्शित केलं. यासाठी त्यांनी भारतीयांची जमवाजमव सुरु केली. १८८५ झालेल्या काँग्रेसच्या स्थापनेचं श्रेय त्यांनाच दिलं जातं. माहितीनुसार, ह्युम हे एक उत्तम पक्षी निरिक्षक होते. त्यांनी पक्षी विज्ञानाविषयी काही पुस्तकंही लिहिली आहेत. ते १८९४ मध्ये इंग्लडला परत गेले, ३१ जुलै १९१२ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान नसतं तर निवडणूक आयोगच नसतं' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT