Who Was Bilal Ahmad Kuchay Esakal
देश

Pulwama Attack 2019: कोण होता बिलाल अहमद कुचाय? 40 जवानांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना दिला होता आश्रय, जम्मूमध्ये झाला मृत्यू

Bilal Ahmad Kuchay: 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा कुचायवर आरोप होता. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात किमान 40 CRPF जवान शहीद झाले होते.

आशुतोष मसगौंडे

Jammu & Kashmir Pulwama News Updates in Marathi: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपी बिलाल अहमद कुचाय याचा जम्मू जीएमसी येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा कुचायवर आरोप होता. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात किमान 40 CRPF जवान शहीद झाले होते.

दरम्यान पुलवामात जवानांवर आत्मघाती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने कुचाय याने दिलेल्या फोनवर घटनेचा व्हिडिओ बनवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना बिलाल अहमद कुचाय याने आश्रय दिला होता. याच कुचायचा सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

आरोपी कुचायला १७ सप्टेंबर रोजी वैद्यकीय उपचारासाठी जीएमसी जम्मू येथे दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो 5 जुलै 2020 पासून किश्तवाड जिल्हा कारागृहात बंद होता.

2020 मध्ये एनआयएने केली होती अट

2019 मध्ये पुलवामा येथील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील कुचायला एनआयएने 2020 मध्ये अटक केली होती.

अहमद कुचाय हा काकापोरा हाजीबल येथे सॉ मिल चालवायचा. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, बिलालने पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना त्याच्या घरात आश्रय दिला होता. यासह दहशतवाद्यांना कुचायने मोबाईल फोनही दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT