Natwar Singh Passes Away Esakal
देश

Natwar Singh: IFS, राजकारणी अन् लेखक... माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह काळाच्या पडद्याआड

Natwar Singh Death: नटवर सिंग यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे झाले, ज्या भारतीय राजेशाही आणि उच्चभ्रू लोकांसाठी पारंपारिक शैक्षणिक संस्था होत्या.

आशुतोष मसगौंडे

माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सिंह यांचा जन्म 1931 मध्ये राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात झाला. नटवर सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA-1 सरकारच्या काळात 2004-05 या कालावधीसाठी नटवर सिंह भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते.

1984 मध्ये, सार्वजनिक जीवनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला.

आपल्या 31 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका, पोलंड, इंग्लंड, पाकिस्तान, चीन, जमैका आणि झांबियासह अनेक देशांमध्ये सेवा बजावली.

1984 मध्ये परराष्ट्र सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नटवर सिंग यांनी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातूनही शिक्षण घेतले होते.

राजकन्येशी विवाह

नटवर सिंह यांचा जन्म 1931 मध्ये राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला. वडिलांचे नाव गोविंद सिंह आणि आईचे नाव प्रयाग कौर होते. ते आपल्या आई-वडिलांचे चौथे पुत्र होते.

ऑगस्ट 1967 मध्ये त्यांनी हेमिंदर कौर यांच्याशी विवाह केला. हेमिंदर या पतियाळाचे शेवटचे राजे यादविंदर सिंग यांच्या कन्या आहेत.

नटवर सिंग यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे झाले, ज्या भारतीय राजेशाही आणि उच्चभ्रू लोकांसाठी पारंपारिक शैक्षणिक संस्था होत्या.

यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून बॅचलरची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि चीनच्या पेकिंग विद्यापीठात काही काळ व्हिजिटिंग स्कॉलरही होते.

राजकीय कारकिर्द

नटवर सिंग यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर ते 1966 ते 1971 पर्यंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित होते.

पुढे निवडणूक लढवण्यासाठी 1984 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. निवडणूक जिंकली आणि १९८९ पर्यंत केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले. नंतर, त्यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-1 सरकारच्या काळात 2004 ते 2005 पर्यंत भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले. नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT