Karnataka Politics esakal
देश

कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? सिद्धरामय्यांविरुद्ध FIR दाखल होताच 'ही' दोन नावं आली चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनले तरी त्यांना आक्षेप नाही. यासंदर्भात हायकमांडने माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या पायउतार झाले, तर मुख्यमंत्रिपद दलित समाजातील सदस्याला मिळावे, या दृष्टिकोनातून काँग्रेसमधील दलित मंत्र्यांच्या बैठका सुरू आहेत. काल सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी सिद्धरामय्या यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मंत्री एच. सी. महादेवप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली.

राज्यात ‘मुडा’ प्रकरण उजेडात आल्याने आणि सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्यावर एफआयआर दाखल होताच दलित मुख्यमंत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचा पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समर्थकांकडून प्रचार करण्यात आला.

२०२८ मध्ये मुख्यमंत्री होण्याची तयारी असल्याचे सांगतानाच समर्थकांची इच्छा नम्रपणे धुडकावून लावणारे सतीश जारकीहोळी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्न खर्गे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदलले तर, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारा, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. यानंतर जारकीहोळी, दलित समाजाचे प्रभावी नेते तसेच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या तुमकूर येथील निवासस्थानी त्यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आज त्यांनी म्हैसूरला जाऊन दलित समाजाचे आणखी एक प्रभावी नेते समाजकल्याण मंत्री डॉ. महादेवप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली.

शिवकुमार यांना आक्षेप नाही

सतीश जारकीहोळी यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून आस्था दाखवल्याबद्दल विरोधी पक्षांचे आभार मानून ते म्हणाले की, सिद्धरामय्या आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. सिद्धरामय्या पाच वर्षे सत्तेत राहणार की तीन वर्षेच, हे हायकमांडने सांगावे.

कोणतीही चर्चा नाही

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनले तरी त्यांना आक्षेप नाही. यासंदर्भात हायकमांडने माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. यापुढील कोणताही निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shivsena: विधानसभेची 'ती' जागा शिवसेनेला; भाजपमध्ये अस्वस्थता! पक्षाला घरघर लागण्याची भीती; 'आरएसएस' सह नेत्यांचे वेधले लक्ष

किस्से निवडणुकीचे! विरेंद्र सेहवागची फलंदाजी अन् काँग्रेस उमेदवार आऊट

Edible oil price : खाद्यतेल दरवाढीने कोलमडले नियोजन...ऐन दसरा, दिवाळी सणांच्या तोंडावर महागाईचा भडका

Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रात पर्यटनाची अफाट क्षमता: पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT