who will win in loksabha election 2024 bjp nda or india alliance abp news c voter survey 
देश

Lok Sabha Survey: आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण जिंकेल? NDA-INDIA ला किती जागा मिळतील?

लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. लोकसभेत कोण बाजी मारेल याबाबत आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये लढत होईल असं जवळपास स्पष्ट आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. लोकसभेत कोण बाजी मारेल याबाबत आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये लढत होईल असं जवळपास स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्याआधी एबीपी न्यूज-सी वोटर सर्वेमध्ये कोणाला किती जागा मिळतील याबाबत भाकित करण्यात आलं आहे.

सर्वेनुसार, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. एनडीला २९५ ते ३३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीला १६५ ते २०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ३५ ते ६५ जागा इतर पक्षांना मिळू शकतात.

याचा अर्थ तिसऱ्यांचा मोदी सरकार देशात सत्ता स्थापन करत आहे. विरोधी पक्षांना एकत्र येऊन देखील फारसा फायदा होत नसल्याचं सर्वे सांगतो. (who will win in loksabha election 2024 bjp nda or india alliance abp news c voter survey)

उत्तर भारत

एबीपी न्यूज सी वोटर सर्वेमध्ये क्षेत्रानुसार, उत्तर भारतातील १८० जागांपैकी एनडीएला १५० ते १६९ जागा मिळू शकतात. तर, इंडिया आघाडीला २० ते ३० जागांवर समाधान मानावे लागू शकतं. इतर पक्षांना उत्तर भारतात १ ते ५ जागा मिळू शकतील.

दक्षिण भारत

दक्षिण भारतात मात्र एनडीएला यावेळीही निराशाच पदरात पडणार आहे. एनडीएला दक्षिणेतील १३२ जागांपैकी २० ते ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, इंडिया आघाडीला दक्षिण भारतात ७० ते ८० जागा मिळू शकतील. इतर पक्षांना २५ ते ३५ जागा मिळतील.

ईशान्य भारत

एबीपी न्यूज सी वोटर सर्वेनुसार, ईशान्य भारतात १३० जागांपैकी ८० ते ९० जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला ईशान्य भारतात ५० ते ६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याठिकाणी एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. इतर पक्षांना ईशान्य भारतात १० ते २० जागा मिळू शकतील. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT