नवी दिल्ली- गुजरातमध्ये गरबा खेळताना १० लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे २४ तासांमध्ये हे मृत्यू झाले होते. यात एका १३ वर्षीय मुलाचा देखील समावेश होता. अनेकजण गरबा खेळताना कोसळले होते.नवरात्रीच्या पहिल्या सहा दिवसांत १०८ क्रमांकावर जवळपास बाराशे फोन कॉल आले होते. त्यामुळे गरबा खेळताना इतक्या मोठ्या प्रमाणात हृदय विकाराचा झटका येण्याचे कारण काय? तज्ज्ञ काय सांगतात हे आपण पाहू.
गरबा म्हणजे अनेक तासांचे नृत्य आले. गाण्यांवर थिरकणे आले. सगळ्यांसोबत असताना आणि कानावर आवडीचे गाणे पडत असताना अनेकजण स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकत नाहीत. पण, याचा परिणाम हृदयावर पडू शकतो. खूप वेळ नृत्य करत राहिल्याने त्याचा ताण हृद्यावर पडत असतो.
गरबाच नाही तर इतरवेळीही सातत्याने न थांबता नृत्य केल्याने थकवा जाणवतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनेकजण गरबाच्या निमित्तानेच शरिराला जास्त ताण देतात. त्यांना अशाप्रकारचा ताण घेण्याची सवय नसते. अचानक त्यांनी शरिराला नृत्यासाठी भाग पाडल्याने त्यांच्या हृद्याचे ठोके वाढतात. अशावेळी शरिराला जास्त ऑक्सिजनची गरज भासत असते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदय विकाराच्या झटक्यामागे आनुवंशिक घटकही असतात. प्राथमिक संकेत म्हणून हृद्यात दुखणे आणि हृद्याची स्पंदने वाढण्याचं जाणवतं. सर्वसाधारणपणे हृदयाकडे जाणारा रक्ताचा पुरवठा थांबला गेला तर हृदय विकाराचा झटका येतो किंवा काही प्रकरणामध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबतात.
गरबा म्हणजे सततची हालचाल, उत्साह, उड्या मारणे, फिरणे याचा समावेश असतो. त्यामुळे हृद्याचे ठोके वाढतात आणि शरीर जास्तीचे ऑक्सिजन मागते. अशावेळी शारीरिक पातळीवर तंदुरुस्त नसलेल्यांमध्ये हृदयासंबंधी अडचण निर्माण होऊ शकतात.
नृत्य किंवा सततच्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि थकवा जाणवतो. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. अशा काळात पाण्याशिवाय खूप काळ नृत्य केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना शारीरिक हालचालींची सवय नाही त्यांनी मर्यादीत नृत्य करण्याचा सल्ला दिला जातो.
काही जणांना पूर्वीपासूनच हृदयासंबंधी अडचणी असतात. त्यामुळे अशा लोकांना जास्त धोका असतो. त्यामुळे अशा लोकांना गरबा पासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. अनेकवेळा शरीरावर ताण पडल्यास हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवतो.
डॉक्टर सल्ला देतात की, प्राथमिक लक्षणं दिसून लागल्यास लगेच गरबामध्ये नृत्य करणे थांबवावे आणि वैद्यकीय मदत घ्यावी. गरबा खेळताना सलग नृत्य करण्यापेक्षा काहीवेळ विश्रांती घ्यावी. काही अंतराने पाणी पेत राहावे. सवय नसणाऱ्यांनी मर्यादेच्या बाहेर शारीरिक हालचाली करु नये. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.