corona news file photo
देश

लस घेतल्यावर देखील अनेकांना कोरोना का होतोय, जाणून घ्या सर्वकाही

सकाळ डिजिटल टीम

जग पुन्हा एकदा कोरोना (Corona) संकटाचा सामना करत आहे, ज्यांनी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली आहे त्यापैकी अनेकांना लस घेतल्यावर ते पूर्णपणे सुरक्षित झाले आहेत, पण तसे होताना मात्र दिसत नाहीये. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. Omicron प्राणघातक ठरत नसला तरी, त्याचा पसरण्याचा वेग मात्र खूप जास्त आहे. कोरोनाचा व्हेरिएंट (Corona Variant) लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना देखील होत आहे. त्यामुळे लस घेऊनही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. लस काम करत नाही का? की आणखी काही कारण आहे? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..

लस घेऊनही कोरोना

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (US-CDCP) सह इतर मोठ्या संस्थांमधील शास्त्रज्ञ, तज्ञांनी लस घेतलेली असूनही संसर्ग होण्याच्या स्थितीला ब्रेक-थ्रू संसर्ग (Breakthrough Infection) असे म्हटले आहे. 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटनुसार, ब्रेक-थ्रू संसर्ग असलेले लोकांकडून इतर लोकांना कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. कारण लस न घेणाऱ्यांच्या नाकात जितके विषाणू जमा होतात तितकेच विषाणू या लोकांच्या नाकात देखील जमा होतात. म्हणजेच, दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी परिस्थिती सारखीच असते.

ब्रेक-थ्रू संसर्ग का होत आहे?

ब्रेक-थ्रू संसर्गाविषयी (Breakthrough Infection) ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या आभ्यासानुसार, कोणतीही लस कोरोनापासून 100% संरक्षण देत नाही. दुसरे- सध्या जगभरातील कोरोना लस अशा आहेत, ज्याचा प्रभाव फक्त 4-6 महिने टिकतो. यानंतर या लसीपासून शरीराला मिळालेली प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. 'द कॉन्व्हर्सेशन'नुसार, या स्थितीला 'Waning Immunity' म्हणतात. जेव्हा जगभरात लस मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती, त्याच वेळी कोरोनाचा सर्वात घातक डेल्टा व्हेरिएंट पसरत होता त्यामुळे रोगप्रतिकारक Waning Immunity चा वेग आणखी वाढला. तसेच लोकांचा निष्काळजीपणा देखील या साठी कारणीभूत आहे, कारण लस दिल्यानंतर मास्क न लावणे, सोशल डिस्टंसींग न पाठणे, वारंवार हात न धुणे यासारखी निष्काळजीपणा बहुतांश लोकांमध्ये दिसून येत आहे.

हे लक्षात घ्या..

त्यामुळे आपल्या सर्वांसाठी कोरोना हा अजूनही धोका आहे , कारण अजूनही लस मिळाल्याचा अर्थ असा नाही की कोरोनाचा संसर्ग होणार नाही. जगात सर्वप्रथम सर्व लोकसंख्येचे लसीकरण करणाऱ्या इस्रायलचा डेटा पाहिला तर, तेथेही कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येत आहे. इस्रायलशी संबंधित आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे डिसेंबर-2020 मध्ये तेथे कोरोना लसीकरण सुरू झाले. 2021 च्या मध्यापर्यंत, तेथे जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले होते. म्हणजे सर्व लोकांना लसीकरण करून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळेच तेथे पूर्वीपासून प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली. दुसरे म्हणजे, लसीकरणानंतरच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 87% लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की जे लोक वृद्ध आहेत आणि आधीच इतर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांना लसीकरण करूनही अधिक धोका आहे.

मग लसीकरणाचा फायदा काय?

क्षिण आफ्रिकेमध्ये प्रथम आढळून आलेला कोरोनाचे सर्वात वेगाने पसरणार व्हेरिएंट ओमिक्रॉन बद्दलच्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की ओमिक्रॉनने सर्व प्रकारच्या लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. ज्यांना लस मिळाली, ज्यांना नाही मिळाली त्यांनाही. परंतु केवळ 28% लोक रुग्णालयात दाखल झाले कारण कोरोना लसीने संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचू दिला नाही. भारतातही महाराष्ट्रात सर्वाधिक संक्रमित रुग्ण असलेल्या राज्यात 80 ते 90% संक्रमित लोक लक्षणे नसलेले आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्यापैकी बहुतेक लोक ते आहेत ज्यांनी लस घेतली आहे. याचा अर्थ, लस आपल्याला गंभीर संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवत आहे.

मग पुढे काय?

लसीचा प्रभाव 4-6 महिन्यांत संपत असल्याने. म्हणूनच प्रत्येकाला कदाचित एकापेक्षा जास्त वेळा बूस्टर डोस घ्यावा लागेल. दुसरे म्हणजे लस अधिक प्रभावी बनवण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. नवीन अधिक प्रभावी लस येऊ शकतात. त्या लसी कदाचित कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करु शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT