Abhijit Gangopadhyay esakal
देश

Abhijit Gangopadhyay: हायकोर्टाच्या न्यायमुर्तींनी राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला? सविस्तर वाचा...

Abhijit Gangopadhyay : कोलकता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी आज (मंगळवार) पदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मनोदय त्यांनी राजीनाम्यानंतर जाहीर केला.

सकाळ वृत्तसेवा

Abhijit Gangopadhyay:

कोलकता: कोलकता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मनोदय त्यांनी राजीनाम्यानंतर जाहीर केला. यामुळे गंगोपाध्याय विधी सेवेतून राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत आज त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर टीका केली. ‘‘भ्रष्टाचाराचा समानार्थी शब्द ‘तृणमूल काँग्रेस’ आहे आणि त्याविरोधात मी शेवटपर्यंत लढेन. मी ७ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि बंगालमधील ‘तृणमूल’च्या भ्रष्टाचाराविरुद्ध तो लढत असल्याने मी भाजपमध्ये सहभागी होत आहे,’’ असे ते म्हणाले.

राजकीय प्रवेशाबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावर थेट उत्तर देण्याचे टाळले.‘‘मी निवडणूक लढवावी की नाही हे भाजप नेतृत्व ठरवेल. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. ‘तृणमूल’च्या अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात मी लढणार आहे,’’ असे गंगोपाध्याय यांनी सांगितले.

ते म्हणाले, की तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते काही काळापासून माझ्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरत आहेत. जर माझे निकाल त्यांच्या पचनी पडत नसले तरी ते न्यायाधीशांवर शाब्दिक हल्ला करू शकत नाहीत. अशा चिथावणीनेच राजकारणात येण्याचा आणि ‘तृणमूल’शी लढण्याचा निर्णय घेण्यास मला मदत झाली. पश्चिम बंगालमध्ये या पक्षाचे दिवस आता भरले आहेत. ‘‘२००९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘माकप’च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचा पराभव झाला. याचा परिणाम म्हणजे २०११ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना हार पत्करावी लागली. ‘तृणमूल’लाही त्याच मार्गाने जावे लागणार आहे, ’’ असा दावा गंगोपाध्याय यांनी केला.

भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी मी हा निर्णय घेतला. रजेवर असण्याच्या काळात मी भाजपच्या संपर्कात होतो. ‘तृणमूल’विरुद्ध लढण्यासाठी हेच योग्य व्यासपीठ आहे असे मला वाटले. भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल विचारले असता, गंगोपाध्याय म्हणाले की त्यांना आणि इतर नेत्यांना अडकवण्यासाठी तृणमूल पक्षाच्या उच्चपदस्थांनी शिजवलेला हा कट आहे.’’

अभिजित गंगोपाध्याय म्हणाले, "मला असे वाटले की मी तेथे (न्यायव्यवस्थेत) पुरेसे काम केले आहे, परंतु जे लोक न्यायालयात जाऊ शकत नाहीत किंवा न्यायालयात जाण्यासाठी संसाधने नाहीत त्यांच्यासाठी काही काम केले पाहीजे. ते खूप असहाय्य आहेत आणि मी माझ्याकडे असलेल्या थोड्याशा साधनांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि म्हणूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे." (Latest Marathi News)

सहा वर्षांचा सेवाकाळ

गंगोपाध्याय यांनी त्यांचे राजीनामा पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविले आहे. तसेच त्याच्या प्रती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि कोलकता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस. शिवगनम यांना सकाळी पाठवल्या. गंगोपाध्याय हे २ मे २०१८ रोजी कोलकता उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. ३० जुलै २०२० रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT