रायपूरमध्ये धर्मांतराबाबत विधान केल्यामुळं धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहिल्यांदा वादात सापडले होते.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham Baba Dhirendra Shastri) सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांच्यावर अंधश्रद्धा वाढवल्याचा आणि पसरवल्याचा आरोप होत आहे.
शास्त्रींविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलीये. मात्र, भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) हे धीरेंद्र शास्त्री यांच्या बाजूनं उभे राहिले आहेत. धीरेंद्र शास्त्रींना पाठिंबा देताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले, मी एक मुलाखत पाहत होतो. यामध्ये शास्त्री म्हणत होते की, चमत्कार हा माझा नसून देवाचा देव आहे. माझा हनुमानजींवर आणि संन्यासींवर पूर्ण विश्वास आहे. मी काहीच नाही, केवळ एक छोटासा साधक आहे, असं शास्त्रींनी म्हटलं होतं.
बाबांच्या वक्तव्यावर विजयवर्गीय पुढं म्हणाले, 'धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. सनातन धर्मात त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. लोक दर्ग्याबाबत प्रश्न का उपस्थित करत नाहीत. तिथं लोकांना मारहाण केली जाते, लोक जमिनीवर लोळतात, पण त्यांना कोणीच विचारत नाही.'
अंधश्रद्धेचा आरोप झाल्यानंतर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाहीये. मी देव आहे असं मी कधीच म्हणत नाही. शास्त्रींनी राज्यघटनेचा हवाला देऊन सांगितलं की, 'कलम 25 अन्वये मला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. या अंतर्गत मी आपल्या धर्माचा प्रचार करत आहे.'
अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं (Andhashraddha Nirmulan Samiti) बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केलाय. समितीनं बाबावर जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला. समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र शास्त्री हे दिव्य दरबार आणि प्रेत दरबारच्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन देत आहेत. धर्माच्या नावावर शास्त्री लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्रातील नागपुरात श्रीराम चरित्र सत्र आयोजित केलं होतं.
18 जानेवारीला रायपूरमध्ये धर्मांतराबाबत विधान केल्यामुळं धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहिल्यांदा वादात सापडले होते. जिथं धर्मांतर होत असेल तिथं रामकथा सांगणार असं त्यांनी म्हटलं होतं. शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर राजकारण सुरू झालं, त्यामुळं त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होत आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर इथं एक तीर्थक्षेत्र आहे. याला बागेश्वर धाम सरकार म्हणूनही ओळखलं जातं. इथं बालाजींची पूजा केली जाते. या ठिकाणी कानाकोपऱ्यातून लोक बागेश्वर धाम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.