pm narendra modi 
देश

पाकिस्तान लगतच्या पंजाबमध्ये भाजपचा राष्ट्रवाद का चालत नाही? जाणून घ्या...

पंजाबचं सांस्कृतीक आणि भौगोलिक स्थानाचा परिणाम आणि बरंच काही

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवाद हा भाजपच्या राजकारणाचा मुख्य धागा आहे. याच मुद्द्यावरुन भाजपनं लोकसभेत दोन जागांवरुन ३०३ जागांपर्यंतचा पल्ला गाठला आहे. पण सीमेवरील राज्य असलेल्या पंजाबमध्ये घरटी एकजण सैन्यात असतानाही भाजपला इथं आपला मजबूत जनाधार बनवता आलेलं नाही. यासाठी भाजपला अकाली दलाशी हातमिळवणी करावी लागली होती. पण तज्ज्ञांच्या मतानुसार, पंजाबच्या राजकारणात शीख धर्माचा सर्वाधिक प्रभाव आहे. तसेच इतर कुठल्याही मुद्द्यापेक्षा तिथं शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा मानला जातो. त्यामुळे भाजप इंथ वैचारिक विस्तार करु शकलेला नाही. आता तर अकाल दलाशी युती तुटल्यानंतर भाजप इथं पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

काँग्रेस नेत्या राधिका खेडा म्हणाल्या, "पंजाबमध्ये भाजप अद्याप यशस्वी होऊ शकलेली नाही आणि पुढेही भाजपला इथं यश मिळण्याची शक्यता नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपचं राजकारण मुस्लिमद्वेषावर आधारित आहे. मुस्लिमांची भीती दाखवूनच भाजप हिंदूंना आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करत असते. परंतू पंजाबमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या खूपच कमी जी सुमारे २ टक्के एवढीच आहे. त्यामुळेच इथे भाजपचा अजेंडा यशस्वी होत नाही."

काँग्रेसच्या नेत्या रितू चौधरी म्हणाल्या, "शीख धर्मात मूलतः सर्व धर्मांबाबत समानता ठेवण्याचा संदेश देण्यात आला आहे. याच कारणामुळं पंजाबच्या समाजात दुसऱ्या धर्माबाबत विरोधाची बाब स्विकारार्ह ठरत नाही. जवळपास ३९ टक्के हिंदू समाज इथं असतानाही पंजाबमध्ये भाजपची रणनीती अद्याप यशस्वी होऊ शकलेली नाही"

आणखी एका नेत्याच्या माहितीनुसार,"भाजपच्या राजकारणात पाकिस्तानचा विरोधाला महत्वाचं स्थान असतं. भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी आसोत किंवा ग्रामपंचायतचा नेता तो आपल्या निवडणुकीत पाकिस्तानचा अजेंडा वापरतोच. त्यामुळे पंजाबमध्ये जिथं प्रत्येक घरटी एकतरी सैन्यात असताना भाजपचा अजेंडा यशस्वी व्हायला हवा पण तो होत नाही. परंतू फाळणीवेळी पंजाब प्रांताचेच दोन तुकडे झाल्यानं भारतातील पंजाब आणि पाकिस्तानातील पंजाब यांच्यामध्ये सांस्कृतीक साध्यर्म आहे. त्यामुळे जमिनीवर पाकिस्तान त्यांच्यासाठी द्वेषाचा मुद्दा होऊ शकत नाही. त्यामुळेच अनेक प्रयत्न करुनही भाजपचा अजेंडा पंजाबमध्ये चालत नाही"

पंजाबमध्ये शीख धर्म खूपच प्रभावी आहे. इथली सुमारे ५८ टक्के जनता शीख धर्मीय आहे. इथं हिंदूंची संख्या ३८.४९ टक्के असून ती दुसऱ्या स्थानी आहे. शीख धर्माच्या राजकारणात अकाली दल परंपरागतरित्या अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे इथे इतर धर्माची राजकीय ताकद नगण्य आहे.

भाजपनं आजवर स्वतंत्र रणनीती आखली नाही

भाजपच्या केंद्रीय टीमच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं म्हटलं की, "भाजप पंजाबमध्ये अकली दलाच्या भरवशावर राहिली. अकाली दलाच्या युतीमुळे पंजाबमध्ये कधी आपल्या स्वतंत्र विकासासाठी ठोस रणनीती बनवली नाही. अकाली दलानं भाजपला लोकसभेसाठी केवळ ३ जागा तर विधानसभेसाठी २३ जागा सोडल्या. त्यामुळे भाजप अमृतसर आणि गुरुदासपूर सारख्या काही मोजक्याच भागापुरती मर्यादित राहिली. भाजपचा इथं वैचारिक विकास होऊ शकला नाही"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पंजाबमध्ये रुजेल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, "संघाच्या हजारो शाखा पंजाबमध्ये नियमितपणे सुरु आहेत. या समाजात लोकांपर्यत पोहोचण्याचं मोठं माध्यम आहे" या नेत्याच्या मते, संघासाठी राष्ट्र हा पहिला मुद्दा आहे. त्यासाठी भाजप समाजातील सर्व धर्म आणि सर्व वर्गांच्या लोकांना सोबत घेण्यावर विश्वास ठेवते. पंजाबमध्ये देखील असाच प्रयत्न करण्यात येईल. हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान सारख्या पंजाबच्या शेजारील राज्यांमध्ये जसं भाजपला यश मिळालं आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात पंजाबमध्येही राष्ट्रवादाच्या जोरावरच भाजपला यश मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT