टिपू सुलतानसह अन्य काही महत्त्वाच्या विषयांना कात्री लावण्याची शिफारस या समितीने केली होती. या शिफारसीला विरोधी पक्ष काँग्रेससह धर्मनिरपेक्ष पक्षानेही विरोध दर्शविला होता.
बंगळूर : भाजपने केलेल्या गोहत्याबंदी (Ban on Cow Slaughter), धर्मांतर यासारखे जनविरोधी कायदे मागे घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी दिली. बुधवारी (ता. २४) विधानसौधमध्ये पत्रकारांसमोर ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘यापूर्वी काँग्रेसने (Congress) गोहत्याबंदी, धर्मांतराला पुष्टी दिली तरी भाजप सत्तेवर आल्यानंतर गोहत्याबंदी, धर्मांतराला निषेध दर्शवून कायदे जारी केले आहेत. आता हे कायदे मागे घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचे काँग्रेस सरकारचे प्रयत्न आहेत. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमातही सुधारणा करू.
जनतेला जाचक ठरणारे कायदे असल्यास ते मागे घेण्यात येतील. राज्यात शांतता-सौहार्दपूर्ण वातावरण असावे, हा काँग्रेस सरकारचा उद्देश असेल. विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न असेल. भाजप सरकाच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचे काँग्रेस नेतेमंडळींनी यापूर्वीच म्हटले आहे. मंत्री खर्गे यांनीही याचा पुनरुच्चार केल्याने राजकीय गोटात खळबळ माजली आहे.
भाजप सरकारच्या काळात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमासाठीच्या चक्रतीर्थ यांच्या नेतृत्वात समिती नेमली होती. टिपू सुलतानसह अन्य काही महत्त्वाच्या विषयांना कात्री लावण्याची शिफारस या समितीने केली होती. या शिफारसीला विरोधी पक्ष काँग्रेससह धर्मनिरपेक्ष पक्षानेही विरोध दर्शविला होता. परंतु, भाजप सरकारच्या दबावाला बळी पडून पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात बदलला होता. त्याला जनतेचाही विरोध झाला होता.
भाजप सरकारने भ्रष्टाचार केला, हे मान्य करण्यास भाजपचे कोणीच तयार नाहीत. उलट भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यानिशी सिद्ध करा, असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणत असल्याचे मंत्री खर्गे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.