Karnataka HC warns Facebook eSakal
देश

Karnataka HC : '..तर भारतात फेसबुक बंद करू'; कर्नाटक हायकोर्टाचा मेटाला थेट इशारा!

उच्च न्यायालयाने फेसबुकला एक आठवड्याचा वेळ दिला आहे.

Sudesh

कर्नाटक हायकोर्टाने बुधवारी फेसबुकला गंभीर इशारा दिला. एका प्रकरणात तपासासाठी फेसबुक कर्नाटक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे आरोप करण्यात आले होते. यानंतर, कंपनीने जर तपासात सहकार्य केले नाही, तर भारतात फेसबुक बंद करू असा इशारा उच्च न्यायालयाने दिला.

काय आहे प्रकरण

न्यायमूर्ती कृष्णा एस. दिक्षित यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला. या खंडपीठासमोर कविता या महिलेच्या प्रकरणाची कारवाई सुरू होती. या महिलेचा पती शैलेश कुमार सौदी अरेबियामध्ये काम करतो, तर ही महिला मंगळुरूजवळ एका गावात राहते. या महिलेच्या पतीने २०१९ मध्ये सीएए कायद्याच्या समर्थनार्थ एक फेसबुक पोस्ट केली होती. मात्र, कोणीतरी त्याच्या नावाने फेक अकाउंट उघडून सौदी अरेबियाचे राजे आणि इस्लामबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या.

ही गोष्ट लक्षात येताच शैलेशने तातडीने आपल्या घरी सांगितलं होतं. त्यानंतर मंगळुरू पोलीस स्टेशनमध्ये कविताने याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, तिकडे सौदीमध्ये शैलेशला या पोस्टमुळे अटक करण्यात आली, आणि तेव्हापासून तो तुरूंगात आहे.

फेसबुकची दिरंगाई

मंगळुरू पोलिसांनी याबाबत तपास करताना फेसबुकला पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी फेक अकाउंटबद्दल माहिती मागवली होती. मात्र, फेसबुकने अद्याप पोलिसांना कोणताही रिप्लाय दिला नाही. तपासात उशीर होत असल्यामुळे २०२१ मध्ये कविताने हायकोर्टात धाव घेतली होती. यासोबतच तिने केंद्र सरकारलाही याबाबत पत्र लिहिले होते.

आठवड्याचा वेळ

"पोलीस मागत असलेली संपूर्ण माहिती एका आठवड्याच्या आत न्यायालयासमोर सादर करावी" असे निर्देश हायकोर्टाने फेसबुकला दिले आहेत. यासोबतच, या प्रकरणात केंद्राने आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत याबाबत कोर्टाने केंद्र सरकारकडून माहिती मागवली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ जून रोजी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji Raje Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु केवळ जिजामाता, संभाजीराजे छत्रपतींचे अमित शहांना उत्तर!

Amit Deshmukh : महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा अधिक कौल; अमित देशमुख यांचा विश्वास

Nashik Crime : कुटूंबिय देवदर्शनासाठी; पाठीमागे घरफोडी, 2 घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

स्नेहलने स्वयंपाक केला आणि १५ दिवस कुणीच... प्रवीण तरडेंनी सांगितला लग्नानंतरचा धमाल किस्सा, म्हणाले- आईने तिला

Udgir Assembly Election : जातीपातीचा विचार न करता संजय बनसोडे यांना पाठींबा द्या; अण्णाभाऊचे नातु सचिन साठे यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT