Will Raise OBC Quota to 42 per from 23 per in Panchayati Raj Telangana said congress leader Rahul Gandhi  
देश

सत्तेत आल्यास OBC आरक्षणाचा कोटा 'इतका' करणार: राहुल गांधींनी केली घोषणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तेलंगणातील एका सभेत बोलताना ओबीसींचे आरक्षण वाढवण्याचे आश्वासन दिले आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा बनत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तेलंगणातील एका सभेत बोलताना ओबीसींचे आरक्षण वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सत्तेत आली तर पंचायत राजमध्ये इतर मागास वर्गीय समाजाचे आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात येईल, असं ते म्हणाले आहेत.(Will Raise OBC Quota to 42 per from 23 per in Panchayati Raj Telangana said congress leader Rahul Gandhi)

तेलंगणामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. शुक्रवारी वारंगलमधील सभेदरम्यान राहल गांधी यांनी भारत राष्ट्र समितीवर (बीआरएस) जोरदार टीका केली. निवडणुकीत बीआरएसचा पराभव होईल आणि काँग्रेसचा विजय होईल. ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, यामुळे पंचायत स्तरावरील २० हजार नेते पुढे येतील.

तेलंगणाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा मागास वर्ग, दलित आणि आदिवासी यांना राजकारणात संधी मिळेल असं वाटलं होतं. पण, तसं होताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वात आधी जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येईल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

देशात किती मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आहेत हे कळायला हवं. जर मागासांची संख्या ५० टक्के असेल तर त्यांचा कोटा ५० टक्के असायला हवा, असं गांधी म्हणाले. काँग्रेसचे पहिले लक्ष सत्ताधारी बीआरएसला सत्तेतून हटवून जनतेचे सरकार आणणे हे असेल, असं राहुल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बिहारमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यात ६२ टक्के ओबीसी समाज असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. संख्येनुसार आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठीचे विधेयक नितीश कुमार सरकारने मंजूर केले आहे. बिहारचा आदर्श घेऊन आता इतर राज्यांमध्येही जातीनिहाय सर्वेक्षण आणि कोटा वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे. काँग्रेसने या मागणीला खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT