CCTV  
देश

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शॉपिंग करुन घरी परतणाऱ्या महिलेला जमिनीवर पाडून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी पाच दिवसांनी अटक केली आहे. पण पोलिसांना या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी त्यांनी तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच त्याच्या दातांच्या निशाणीवरुन त्याची ओळख पटवली. (With verify of 200 CCTVs and traces of teeth mark police found rape accused)

आरोपीला पकडण्यासाठी कानपूर पोलिसांनी २ किलोमीटरच्या परिघात लावलेले २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर आरोपीच्या दिसण्यावरुन पाच तरुणांशी संवाद साधत त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर आरोपीची ओळख स्पष्ट झाली आहे. या घटनेवेळी पीडित महिलेनं आरोपीच्या हातावर चावा घेतला होता. त्यामुळं देखील पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गेल्या १४ मे रोजी ही महिला कानपूरच्या रावतपूर भागातील शॉपिंग कॉम्प्लेसमधून खरेदी करुन घरी जात होती. त्याचवेळी एका फॅक्टरीजवळून एका तरुणानं या महिलेनं मागून हल्ला केला. धक्का लागल्यानं ही महिला खाली पडली. त्याचवेळी आरोपीनं थेट महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. पण महिलेनं आपलं डोकं लावत जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. तसेच आरोपीच्या हातावर जोरदार चावा घेतला. त्यामुळं त्याच्या हातातून रक्त यायला लागलं. यावेळी पकडलं जाण्याच्या भीतीनं तो महिलेला सोडून तिथून पळून गेला.

आरोपीच्या हातावर दातांचे निशाण असल्यानं पटली ओळख

या प्रकरणाबाबत डीसीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, सीसीटीव्हीच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांमध्ये आरोपी आकीब देखील होता. पकडल्यानंतर आरोपीनं काहीही माहिती दिली नाही पण त्याच्या हातावरील जखमेबाबत विचारलं असताना त्याचं समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर जेव्हा पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, आपण आरोपीच्या हातावर चावा घेतला होता. त्यानंतर पीडित महिलेला पाहिल्यानंतर आणि खरी माहिती समोर आल्यानंतर आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीकडं सापडला गावठी कट्टा

दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून पोलिसांनी एक बॅग देखील जप्त केली. यामध्ये त्यांना एक गावठी कट्टा आणि आक्षेपार्ह फोटो मिळाले आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपीच्या माहितीनुसार तो नशेत होता. त्यामुळंच महिलेला एकटीला जाताना पाहून त्यानं तिचा पाठलाग केला. पोलिसांच्या अधिक चौकशीत या आरीपीनं यापूर्वी देखील अनेक महिलांवर अशा प्रकारे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT