भारताच्या नैऋत्य भागातून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याने सोमवारी ही माहिती दिली. यावेळी मान्सूनची माघार नेहमीपेक्षा आठ दिवस उशिराने सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्वी त्याची कटऑफ तारीख १७ सप्टेंबर मानली जात होती आणि १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परत जातो.
हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, राजस्थानच्या नैऋत्य भागातून नैऋत्य मान्सूनची माघार आज पूर्ण झाली आहे. साधारणपणे १७ सप्टेंबरपर्यंत मान्सून या प्रदेशातून माघार घेतो.
मान्सून उशिरा माघारीचा परिणाम काय?
हे लागोपाठ १३ वे वर्ष आहे जेव्हा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू करण्यास उशीर झाला आहे. नियोजित वेळेच्या तुलनेत मान्सूनची माघार लांबली असून उत्तर-पश्चिम भारतातून मान्सून उशीरा माघारी फिरल्याने भारतीय उपखंडात घेतल्या जाणाऱ्या पिकांवरही याचा परिणाम होतो, कारण मान्सून उशीरा परत फिरल्याने देशात पावसाळाही लांबतो, ज्याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. विशेषतः उत्तर-पश्चिम भारतात, जिथे मान्सून रब्बी पिकांच्या वाढीमझ्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
हवामान विभागाने २१ सप्टेंबर रोजी २१ ते २७ सप्टेंबर अखेर मान्सूनची माघार सुरू होऊ शकते, असे सांगितले होते. त्याचवेळी, ३० सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पावसाचे प्रमाण ९० ते ९५ टक्के दरम्यान असेल. जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यातील सर्वसाधारण सरासरी ८६८.८ मिमी असते. IMD नुसार, २१ सप्टेंबरपर्यंत देशातील एकूण पाऊस सात टक्क्यांनी कमी झाला होता. ३६ टक्के जिल्ह्यांमध्ये एकतर कमी (सामान्यापेक्षा २० ते ५९ टक्के) किंवा खूपच कमी (सामान्यापेक्षा ५९ टक्क्यांहून अधिक कमी) पाऊस झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.