Ujiarpur Health Department esakal
देश

महिलेनं तीन महिन्यांत दोन मुलांना दिला जन्म

सकाळ डिजिटल टीम

समस्तीपूर जिल्ह्यातील उजियारपूर पीएचसीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलंय.

समस्तीपूर (Samastipur) जिल्ह्यातील उजियारपूर पीएचसीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलंय. आशा कार्यकर्त्याच्या (Asha Worker) संगनमतानं एका महिलेनं नऊ महिन्यांऐवजी तीन महिने 12 दिवसांच्या कालावधीत दोनदा मुलाला जन्म दिलाय. दोन्ही वेळा महिलेनं मुलास जन्म दिला आहे. मात्र, त्याची माहिती आरोग्य विभागाला नव्हती.

दोन्ही वेळा सदर महिलेला उजियारपूर रुग्णालयात (Ujiarpur Hospital) दाखल करून बाळंतपण केलं. सदर महिला हरपूर रेबारी गावातील आहे. या फसवणुकीमागं जननी बाल सुरक्षा योजनेचा (Janani Bal Suraksha Yojana) फायदा असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सीएस डॉ. सत्येंद्र कुमार गुप्ता (Dr. Satyendra Kumar Gupta) यांनी अतिरिक्त उपअधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केलंय.

माहितीनुसार, ही महिला (वय 28) उजियारपूर ब्लॉकमधील हरपूर रेबारी गावची रहिवासी आहे. याच गावातील आशा रीता देवी (Rita Devi) यांच्या मदतीनं तिला 24 जुलै रोजी पहिल्यांदा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच दिवशी महिलेनं एका मुला जन्म दिला. यानंतर, सदर महिलेला प्रसूतीसाठी 3 नोव्हेंबर रोजी पुन्हा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं आणि 4 नोव्हेंबर रोजी तिनं आणखी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आलं.

नोव्हेंबरमध्ये उजियारपूर पीएचसीमध्ये संस्थात्मक प्रसूती झाल्यानंतर, जननी बाल सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या प्रोत्साहन रकमेचा तपशील तयार केला जात होता. यावेळी सदर महिलेची प्रसूतीही 24 जुलै रोजी झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं 31 जुलै रोजी जननी बाल सुरक्षा योजनेंतर्गत दिलेली प्रोत्साहन रक्कमही भरलीय. आता पुन्हा 4 नोव्हेंबर रोजी प्रसूतीबाबत प्रकरण अडकलंय. रुग्णालयाचे लेखापाल रितेशकुमार चौधरी (Ritesh Kumar Chaudhary) यांनी तातडीनं पीएचसीचे प्रभारी, रुग्णालय व्यवस्थापक, डीएएम आणि डीपीएम यांना कळवलं असून त्याचं पेमेंटही थांबवलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT