Crime News Esakal
देश

Crime News: मुलीशी लग्न करायचं होतं! लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली अन्...

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका तरुणीचे तिच्या मैत्रीणीसोबत समलैंगिक प्रेम होते, तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. यामुळे ती तिचे लिंग बदलण्यासाठी (मुलगीपासून मुलगा) तांत्रिकाकडे गेली. तांत्रिकाने मुलीची हत्या केली. दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आता मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपास करत तांत्रिक आणि मुलीच्या मैत्रीणीला अटक केली आहे.(Latest Marathi News)

ठाणे आरसी मिशन परिसरात राहणारी पूनम १८ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. २६ एप्रिल रोजी तिच्या भावाने पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस तरुणीचा शोध घेत होते. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, मुलीला शाहजहांपूरमधील पुवायन येथे राहणारी तिची मैत्रीण प्रीती हिच्याशी लग्न करायचे होते.(Latest Marathi News)

यानंतर, रविवारी, 18 मे रोजी लखीमपूरच्या तहसील मोहम्मदी येथून एका मुलीचा सांगाडा सापडला. पोलिसांनी तपास केला असता हा सांगाडा पूनमचा असल्याचे निष्पन्न झाले.

पूनमला तिच्या मैत्रीणीशी लग्न करायचे होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमचे ​​पुवायां येथील प्रीतीसोबत समलैंगिक संबंध होते, तिला लग्न करायचे होते. पूनम मुलाच्या स्टाईलमध्ये राहायची. पूनममुळे प्रितीची ठरलेली लग्न तुटतं होती. यानंतर प्रीतीची आई उर्मिलाने लखीमपूर खेरी येथील मोहम्मदी तहसीलमधील रहिवासी रामनिवास यांच्याशी संपर्क साधला. रामनिवास हा व्यवसायाने गवंडी आहे, पण तो भूतविद्याही करत असे.(Latest Marathi News)

मैत्रीणीच्या नातेवाईकांनी तांत्रिकाला हत्येसाठी दिले पैसे

रामनिवासावर त्यांचा विश्वास होता. त्याने पूनमला प्रीतीचे लग्न न करण्याचे कारण सांगितले आणि तिला मधून हटवण्याच्या बदल्यात रामनिवासला दीड लाख रुपये दिले. यासोबतच ५ हजार रुपये जास्त दिले.(Latest Marathi News)

रामनिवासने प्रीती आणि पूनमला जवळच्या जंगलात बोलावले. तेथे त्या दोघींचे लग्न करणार असल्याचे सांगितले. तंत्रविद्येने मी तुला मुलीतून मुलगा बनवतो, असे त्याने पूनमला सांगितले. यानंतर रामनिवासने पूनमला पुन्हा जंगलात बोलावले, तेथे त्याने पूनमवर तंत्रमंत्र केला आणि संधी मिळताच तिच्यावर मडक्याने सतत वार करून तिची हत्या केली. यानंतर मृतदेह जंगलातील झुडपात लपवून ठेवण्यात आला.(Latest Marathi News)

या घटनेबाबत एसपी सिटी काय म्हणाले?

या प्रकरणी एसपी सिटी सुधीर जैस्वाल सांगतात की, 18 मे रोजी पुराव्यांद्वारे पोलिसांनी लखीमपूर खेरीच्या मोहम्मदी तहसीलमधील घनदाट जंगलात गोमती नदीच्या काठावर पूनमचा सांगाडा सापजडला आहे. तेथे पूनमचा भाऊ परमिंदर याने पूनमचे ​​कपडे पाहून ओळख पटवली.(Latest Marathi News)

परविंदरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. रामनिवास, प्रीती आणि तिची आई उर्मिला यांनी आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप परविंदरने केला आहे. पोलिसांनी तांत्रिक रामनिवास आणि पूनमची मैत्रीण प्रीती यांना अटक केली आहे. प्रीतीची आई उर्मिला अद्याप फरार असून, तिला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT