crime news sakal
देश

महिलेची चालकाकडूनच हत्या, सहा वर्षीय चिमुकलीमुळे उघडकीस आली घटना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एका ३६ वर्षीय महिलेची त्यांच्याच वाहन चालकाने गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ६ वर्षीय चिमुकलीमुळे घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील सीआर पार्कमध्ये (Delhi Crime) ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किम्मी बस्सी असे मृत महिलेचे नाव आहे. ती सीआर पार्क परिसरात दोन मुले आणि पतीसोबत राहत होती. तिच्या पतीचे पहाडगंजमध्ये भोजनालय आहे. २ नोव्हेंबरला महिला तिच्या घरात पडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत तिला एम्स रुग्णालयात नेले. मात्र, त्याठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले. तसेच तिच्या मानेवार काही जखमा आढळून आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर तिची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, तपास पथकाने मृताच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सहा वर्षांच्या चिमुकलीमुळे आरोपीची ओळख पटली. आईचा खुन झाला त्यावेळी चालक सचिन त्याठिकाणी उपस्थिती असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सचिनच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आला. मात्र, त्याचा फोन बंद होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून सचिनला अटक केली. पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. मात्र, प्राथमिक माहितीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Satara Election Results : 'जयाभाऊ तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

"कोण किशोर कुमार ?" आलियाच्या प्रश्नाने रणबीरला बसला धक्का ; म्हणाला...

Latest Maharashtra News Updates : मोठी बातमी! ..अखेर एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

SCROLL FOR NEXT