taxi 
देश

कामावरुन घरी परतणाऱ्या विवाहित महिलेवर टॅक्सीमध्ये बलात्कार

ड्रायव्हरने तिला पुढच्या सीटवर बसायला सांगितले. मागच्या सीटवर दुसरे प्रवासी बसणार असल्याचे त्याने कारण दिले.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: कामावरुन घरी परतणाऱ्या एका महिलेवर टॅक्सीमध्ये बलात्कार (women rape in taxi) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरापर्यंत लिफ्ट देतो सांगून, एका टॅक्सी चालकाने (cab driver) महिलेला कारमध्ये बसवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बुधवारी रात्री दिल्लीमध्ये (delhi) ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिला मेहरोली-गुरुग्राम रोडवरील एका मॉलमध्ये (Mall) नोकरी करते. (Woman raped by cab driver on way home to Delhi dmp82)

पीडित महिला तिच्या घरच्या वाटेवर असताना, ही घटना घडली. "एमजी रोडवरच्या बस स्टॉपवपर महिला टॅक्सीमध्ये बसली. ड्रायव्हरने तिला पुढच्या सीटवर बसायला सांगितले. मागच्या सीटवर दुसरे प्रवासी बसणार असल्याचे त्याने कारण दिले. टॅक्सी चालक कार चालवत असताना, मध्येच त्याने निर्जन रस्त्यावर कार थांबवली व महिलेवर बलात्कार केला" असं गुरुग्राम पोलीस ठाण्याचे प्रवक्ते सुभाष बोकीन यांनी सांगितले.

आरोपी टॅक्सी चालकाने महिलेला अया नगर सीमेवर सोडले. महिलेने गुरुवारी डीएलएफ फेज २ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. चालकाने माझ्या बरोबर छेडाछाड केली. ज्यावेळी मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने मला धमकावले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिला रात्री आठ वाजता कामावरुन घरी जाण्यासाठी निघाली. ८.१५ मिनिटांनी ती टॅक्सीमध्ये बसली.

त्या महिलेला सोडण्याआधी ड्रायव्हरने तिला तिची पर्स आणि मोबाइल फोन परत केला. तिने लगेच नवऱ्याला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीनंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अज्ज्ञात टॅक्सी चालकाविरोधात कलम ३७६ (बलात्कार) आणि ३५४ (छेडछाड) या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT