smriti-irani 
देश

"सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही" - स्मृती इराणी

"पक्षीय राजकारण विसरुन सोशल मीडियावरील महिलांवरील चिखलफेकीवर आवाज उठवण्याचं केलं आवाहन"

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) महिलांचा सन्मान राखला जात नाही मग त्या कुठल्याही धर्माच्या असोत, अशी खंत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी व्यक्त केली आहे. तसेच या विरोधात पक्षीय राजकारण विसरुन सर्वांनी आवाज उठवायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्या बोलत होत्या. (Women are not respected on social media Smriti Irani expressed grief)

इराणी म्हणाल्या, "सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही. त्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय आणि दूरसंचार विभागासोबत सक्रीय स्वरुपात काम करत आहे. तसेच लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला हवं"

बुली बाई अॅप, अभिनेता सिद्धार्थचं साईना नेहवालविरोधातील आक्षेपार्ह ट्वीट तसेच दिल्लीतील निर्भया केससंदर्भात इराणी यांनी चर्चा केली. यानंतर महिलांना एका अॅपच्या माध्यमातून केवळ लैंगिक भावनेतूनच पाहिलं जातयं का? असा सवालही त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, सध्या महिलांची सरसकट एका विशिष्ट भावनेतून सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाहीए. पण मी पोलिसांचे आभार मानेन की त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा मिळेल याची मला खात्री आहे. पोलीस आणि न्याय व्यवस्थेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकरणं समोर येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच या मुद्यावर लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

भारतात महिलांचं लग्नाचं वय वाढवणाऱ्या विधेयकाबाबत बोलताना इराणी म्हणाल्या, "जेव्हा मी संसदेत मुलींचं लग्नाचं वय २१ व्या वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी केली तेव्हा मला देशभरातून पाठिंबा मिळाला. पण मुलींचं लग्नाच वय वाढवण्यामागे एका समाजावर गु्न्हेगारी ठपका ठेवण्याचा डाव असल्याच्या केवळ अफवा आहेत. ज्या लोकांना महिलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवायचं आहे तेच अशा अफवा पसरवत आहेत, असंही इराणी यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT