Women Reservation Bill rahul gandhi 
देश

Women Reservation Bill: भाजपकडून ओबीसी समाजाचा अपमान; राहुल गांधींकडून आकडेवारी सादर करत हल्लाबोल

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत लोकसभेत भाष्य केलं. महिला ओबीसींना या विधेयकांमध्ये स्थान नाही. त्यामुळे यात ओबीसींचा समावेश असावा कशी काँग्रेसची भूमिका असल्याचं ते म्हणाले.

महिला आरक्षण देणे महत्त्वाचं पाऊल आहे. पण, त्यात अनेक कमतरता आहेत. ओबीसींना यात आरक्षण देण्यात आले आहे. तसेच महिलांना आरक्षण मिळण्यासाठी ७ ते ८ वर्ष वाट का पाहावी? त्यांना तात्काळ आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. आजच विधेयक पास करुन घेण्यात यावे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. देशात जातींनुसार जणगनणा घेण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी म्हणाले.

ओबीसींचा आपल्या केंद्रीय संस्थांमध्ये किती प्रमाणात सहभाग आहे. याबाबत मी अभ्यास केला आहे. ज्या केंद्रीय संस्था आहेत, त्यात ९० सचिव प्रमुख पदावर आहेत. पण, या ९० सचिवांपैकी केवळ ३ ओबीसी सचिव आहेत. ९० लोक देशातील महत्त्वाच्या संस्था सांभाळतात. त्यातील ३ फक्त ओबीसी आहेत. यांच्याकडे फक्त ५ टक्के बजेटचे नियंत्रण आहे. याचा अर्थ भारताचे बजेट ४४ लाख कोटी असेल तर २.७ कोटी बजेटचे नियंत्रण यांच्याकडे आहे. ही असमानता आहे, असं राहुल यांनी सांगितलं.

या विधेयकातून लोकांच्या हाती सत्ता दिली जाणार असल्याचं म्हटलं जातं. पण, ओबीसींना योग्य प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे ओबीसींचा हा अपमान असून शरमेची बाब आहे. ओबीसी आणि दलित समाजाला किती प्रतिनिधीत्व दिलं जात आहे? त्यांना योग्य हक्क मिळण्यासाठी जणगनणा आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते करण्यात यावी. महिलांना आजच आरक्षण द्यावे असं राहुल म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi यांची १४ नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा, वाहतुकीत मोठा बदल, महत्त्वाचे मार्ग बंद ठेवणार

IPL 2025: दिल्ली संघात २०११ वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची एन्ट्री! १८ व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

Sharad Pawar : चुकीची कामे किती करावी, फसवेगिरी किती करावी; फसवेगिरी करणाऱ्यांना धडा शिकवा

Women’s Asian Champions Trophy: दीपिकाच्या गोलमुळे भारताचा विजय; दक्षिण कोरियावर ३-२ने मात

Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना नमन; म्हणाले- छत्रपतींच्या पुण्यभूमीमध्ये औरंगजेबाचे.....

SCROLL FOR NEXT