Women unite against manipur violence leaders await PM modi visit Human chain protest call for peace sakal
देश

Manipur violence : हिंसाचाराविरुद्ध महिला एकवटल्या; पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत मणिपूरचे नेते

अस्वस्थ मणिपूर ः मानवी साखळी करून निषेध, शांततेचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : गेल्या महिन्याभराहून अधिक काळ हिंसाचारात होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये शांततेसाठी महिलांनी पुढाकार घेता आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी शेकडो महिला रस्त्यांवर उतरल्या. मैतेई समुदायातील हातात मशाल घेतलेल्या महिलांनी इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि काकचिंग या जिल्ह्यांत रस्त्यावर मानवी साखळी करत शांततेसाठी आवाहन केले.

म्यानमारमधून मणिपूरमध्ये होणाऱ्या बेकायदा स्थलांतराविरुद्धही या महिलांनी निदर्शने केली. राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिके (एनआरसी)ची अंमलबजावणी करण्याची मागणी करतही त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मणिपुरातील मीरा पायबी या महिला चळवळीतील नेत्या थौनाओजम किरण देवी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, मणिपूरमधील हिंसाचार थांबवून सुरक्षा पुरविण्यात अपयश आल्यामुळे आम्ही केंद्र तसेच राज्य सरकारवर कमालीचे नाराज आहोत.

मागील महिन्यात मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायात झालेल्या हिंसाचारात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मैतेई समुदायाने अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चानंतर हिंसेला सुरूवात झाली होती. त्यानंतर, मणिपूरमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. मात्र, राज्यात अजूनही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत मणिपूरचे नेते

हिंसाचाराच्या विळख्यात होरपळत असलेल्या मणिपूरचे सर्वपक्षीय नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अद्यापही भेट दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मणिपूरमधील दहा प्रमुख विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत आले आहेत. यात टीएमसी, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, सीपीआय या पक्षांचा समावेश आहे.

या सर्वांनी पंतप्रधानांना भेटीची वेळ मागितली आहे परंतु त्यांना भेटीची वेळ मिळालेली नाही. याबद्दल आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘मन की बात करण्याऐवजी मणिपूर की बात करा,’’ असा सल्ला खर्गे यांनी दिला आहे.

वाजपेयींनी केली होती चर्चा

जवळपास वीस वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. याची आठवण काँग्रेस नेते खासदार जयराम रमेश यांनी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT