Dr. Neelam Gorhe sakal media
देश

Dr. Neelam Gorhe : महिलांचे प्रश्‍न आता येताहेत केंद्रस्थानी ; डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांचे निवडणुकीतील प्रतिनिधित्व वाढत आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महिलांचे निवडणुकीतील प्रतिनिधित्व वाढत आहे, प्रचारात महिलांचे प्रमाण वाढत आहे आणि महिलांचे प्रश्नही निवडणुकीत प्राधान्याने चर्चेला येत आहेत, असे सांगतात महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे.

प्रश्न : यावेळची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्यांवर होईल असे वाटते?

नीलम गोऱ्हे : पायाभूत सुविधांच्या माध्यमातून झालेला विकास, देश आणि राज्याची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व हे महायुती आणि एनडीएच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे असतील. याशिवाय अयोध्येतील राम जन्मभूमीची वचनपूर्ती, ३७० वे कलम, कश्मिरमधील शांतता-सुव्यवस्था, जी-२०चे यश हे मुद्दे सरकारच्या बाजूने असतील. आम्ही दिलेली वचने पाळली हे महत्त्वाचे. महाराष्ट्रातही महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय आमच्या प्रचारात असतील.

प्रश्नः महिला मतदारांची संख्या जवळपास निम्म्याने असताना त्यांना निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व मिळते, असे वाटते का?

- गेल्या वीस वर्षांत महिलांमध्ये खूप जागृती झाली आहे. केवळ मतदार म्हणूनच नव्हे, तर महिला लोकप्रतिनिधी म्हणूनही. महिला उमेदवार असतील तर प्रचारक, कार्यकर्त्या म्हणून महिलांची संख्या लक्षणीय वाढलेली दिसते.२०१४ पूर्वी काही काळ महिलांचा कल भाजपच्या विरोधात आणि विशेषतः काँग्रेसच्या बाजूने असायचा. २०१४ नंतर त्यात बदल होत गेले आणि आता तर अधिक मतदारांचा कल एनडीए आणि महायुतीच्या बाजूने असल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. ज्या महिलांना राजकीय वारसा नाही त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. हिंसाचार, पैशाचा प्रश्न, चारित्र्यहननाची भीती अशा कारणांमुळे स्त्रियांचा राजकीय सहभाग दुय्यम राहतो.

प्रश्नः महिलांच्या प्रश्नांना निवडणुकीत पुरेसे प्राधान्य मिळते का?

- महिलांचे प्रश्न टाळून कुणीच राजकारण करू शकत नाही. मुलींसाठीच्या विविध योजना, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, आनंदाचा शिधा या मला सुट्या सुट्या योजना वाटत नाहीत. महिलांना एका सूत्रात बांधणा-या या योजना आहेत. महिलांचा कष्टाचा भार कमी करणे, आर्थिक चणचणीतून त्यांना मार्ग सापडावा, असा या योजनांचा हेतू स्पष्ट आहे. स्त्रियांच्यावर इतके हल्ले होऊनही स्त्रिया मागे हटत नाहीत, ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी. निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये अनेक योजना महिलाकेंद्री असतात. एकूण राजकीय प्रक्रियेत महिलांचा प्रवास परिघावरून केंद्रस्थानाकडे चाललेला आहे.

प्रश्नः तुमचा पक्ष कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरा जाणार आहे?

- प्रकल्प सुरू झाला आणि तो पूर्ण झाला असे पूर्वी दिसायचे नाही. वर्षानुवर्षे कामे चालायची. आता परिस्थिती बदलली आहे. डोळ्यासमोर सुरू झालेले प्रकल्प पूर्ण झालेले दिसतात. नितीन गडकरी यांच्या कामाचा झपाटा दिसतो. महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारने रस्त्यांचे चांगले जाळे निर्माण केले आहे. उद्योगात अनेक नवी क्षेत्रे उभी राहिली आहेत. तीन-चार वर्षांत अनेक नव्या विद्यापीठांना मान्यता मिळाली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांना मागणी वाढत असून शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होतोय. त्यामुळे शहरात होणारे स्थलांतर कमी होत आहे.

प्रश्नः तुम्ही अचानक गट बदलून एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत गेलात, त्याविषयी.

- मी मुळात स्त्री चळवळीतील कार्यकर्ती असून समान नागरी कायदा हा आमचा अजेंडा राहिला आहे. राज्याचे चौथे महिला धोरण करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. धोरणाच्या आधीच महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. एकनाथ शिंदे यांनी मला नेतेपदही दिले. राज्यातील नेतृत्व केंद्राशी समन्वय साधणारे असेल तर राज्याचा विकास गतीने होऊ शकतो, अशी माझी धारणा आहे. शिवाय इथे नेतृत्वाशी संवादही नीट होतो. अशा काही कारणांमुळे मी माझी भूमिका बदलली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT