नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. या विधेयकावर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर इतर महिला खासदारांनीही चर्चेत सहभाग घेतला, यावेळी त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
सरकारला महिलांची इतकीच काळजी आहे तर त्यांनी खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांना पदावरुन का हटवलं नाही, असा सवाल? त्यांनी केला. (Womens Reservation Bill women MPs slams Modi government over Brijbhushan Singh in Lok Sabha)
तृणमूल काँग्रेसच्या खासदार डॉ. काकोली घोष म्हणाल्या, "जर तुम्हाला महिलांची इतकीच चिंता होती तर तुम्ही इतक्या वेळानं हे विधेयक का घेऊन आला आहात. निवडणुकीच्या तोंडावर हे विधेयक आणणं तुमच्या हेतूवर शंका निर्माण करतं. मला सरकारवर विश्वास नाही. महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक शोषण प्रकरणात ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई का नाही झाली? असा सवालही त्यांनी केला.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी म्हटलं की, महिला सक्षम असू शकत नाहीत का? त्यांनी कधी युद्ध लढली आणि जिंकली नाहीत का? इंदिरा गांधींसारख्या मजबूत नेत्या या देशात झाल्या नाहीत का? या प्रश्नांवर भाजपच्या खासदारांनी गोंधळ सुरु केल्यानंतर त्या म्हणाल्या, जयललिता देखील सक्षम नेत्या होत्या. यावेळी त्यांनी सोनिया गांधी, मयावती, ममता बॅनर्जी तसेच सुषमा स्वराज यांचंही नाव घेतलं. (Latest Marathi News)
कनिमोझी बोलत असताना भाजपचे खासदार गोंधळ घालायला लागले तेव्हा शेजारी बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे जागेवरुन उठल्या आणि त्यांनी कनिमोझी यांच्याबरोबरीनं बोलू लागल्या. या दोघींनी यावेळी अध्यक्षांना म्हटलं की, भाजपचे लोक महिलांची असाच सन्मान करतात का? त्यानंतर भाजपचे खासदार शांत झाले. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.